Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

Sindhudurg Monsoon Update : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी-नाले पुन्हा दुथडी भरून वाहू लागले आहेत.

Team Agrowon

Sindhudurg Rain News : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी-नाले पुन्हा दुथडी भरून वाहू लागले आहेत. पावसामुळे रखडलेल्या भातरोप पुनर्लागवडीला वेग आला आहे. दरम्यान शुक्रवार (ता. १४) सकाळपासुनच जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. काही भागांत हलका तर काही भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडत होत्या. मात्र त्याचा भातरोप पुनर्लागवडीकरिता उपयोग होत नव्हता. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेली भातरोप पुनर्लागवड थांबली होती.

दरम्यान गुरुवारपासून (ता. १३) जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली. गुरुवारी सकाळपासून जिल्ह्याच्या सर्व भागांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत होत्या. परंतु दुपारनंतर पावसाचा जोर वाढला.

त्यानंतर सायकांळी उशिरा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता. रात्रभर पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. पावसाचे दमदार कमबॅक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा भातरोप पुनर्लागवडीला सुरुवात केली आहे.

सोमवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १४) सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून १७ जुलैपर्यंत जिल्ह्याच्या सर्व भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT