Vidarbha Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अनेक भागांत जोरदार पाऊस

Latest Rain Update : गेले दोन दिवस जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : गेले दोन दिवस जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. गुरुवारी (ता. २१) सायंकाळी त्यामध्ये आणखीनच वाढ झाली. जिल्ह्याच्या बहुतांश भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले.

दडी मारलेल्या पावसाने ऐन गणेशोत्सवात जोरदार हजेरी लावली आहे. गणेश चतुर्थीपासून अनेक भागांत पावसाच्या सरी पडण्यास सुरुवात झाली. गुरुवारी विजांच्या गडगडाटांसह पावसाच्या सरी झाल्या.

दरम्यान, शुक्रवारी (ता. २२) पहाटेपासूनच जिल्ह्यात पावसाचे वातावरण होते. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. गेले दोन दिवस वैभववाडी, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग भागात पावसाचा जोर अधिक राहिला.

वेंगुर्ला, मालवणमध्ये जोरदार सरी पडत आहेत. देवगड तालुक्यात काही भागांत हलक्या, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. मात्र वैभववाडी तालुक्यात सातत्याने पाऊस सुरू आहे.

या शिवाय दोडामार्ग तालुक्यातही पावसाच्या चांगल्या सरी बरसत आहेत. यामुळे गणेशोत्सवासाठी उत्साहाने आलेल्या चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे. नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. याशिवाय सध्या पडत असलेला पाऊस भातपिकांना पोषक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT