Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : अकोला, बुलडाण्यात मुसळधार

Latest Rain Update : मागील २४ तासांत पश्‍चिम विदर्भात सर्वदूर पावसाचे पुनरागमन झाले आहे. बुलडाणा, अकोला जिल्ह्यांत काही मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली.

Team Agrowon

Akola News : मागील २४ तासांत पश्‍चिम विदर्भात सर्वदूर पावसाचे पुनरागमन झाले आहे. बुलडाणा, अकोला जिल्ह्यांत काही मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. वाशीम जिल्ह्यातही सर्वत्र पाऊस झाला आहे.

शुक्रवारी (ता. २२) सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाले होते. अखेर गुरुवारी (ता. २१) दुपारनंतर अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत सर्वच तालुक्यांत जोरदार पावसाला सुरुवात झाली.

या दोन जिल्ह्यांत जवळपास १८ मंडलांमध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसला. अकोला व वाशीम जिल्ह्यांत वीज पडून दोघांचा मृत्यूही झाला. मोठ्या कालखंडानंतर गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी दिली. पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वाशीम जिल्ह्यात अनसिंग येथे वीज पडून नफिसा परवीन शेख रफिक (वय २८) या महिलेचा मृत्यू झाला. नताज बी शेख सत्तार (वय ३५) ही महिला गंभीर जखमी झाली. अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील टाकळी खुरेशी गावात अंगावर वीज पडून पद्माकर आत्माराम घोगरे (वय ५८) यांचा मृत्यू झाला. अकोल्यात दुपारनंतर ढग दाटून आले व जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली. सर्वदूर पाऊस झाला.

जोरदार पाऊस झालेली मंडले ः

जामोद ३०.५, आसलगाव ३४, संग्रामपूर १९.३, सोनाळा २१.८, एकलारा २९, मेरा खुर्द ४८.३, घोडप ५४.३, पेठ २५.३, चांदई ३७.२, रायपूर २७.८, धाड ३३.५, म्हसला ४३.८, साखळी बुद्रुक ४९.३, मेहुणाराजा ४८, जानेफळ ५०, शेलगाव देशमुख ५४.३, देऊळगाव माळी ४३.३, लोणी ५८.५, किनगावराजा ३२.८, साखरखेर्डा ५५, लाखनवाडा ४२, अटाळी ४२.५, दाताळा ५३.५,

नरवेल ४३.८, जांबूळधाबा ५७, अकोला जिल्ह्यात अकोला येथे ५०.८, कापशी ५६.३, बोरगाव मंजू ६६.३, शिवणी ४५.५, पळसो ६७.५, बार्शीटाकळी ३७.३, निंबा ४०.८, माना ५६, वाशीम जिल्ह्यात पार्डी टकमोर ३४, अनसिंग ४५.३, राजगाव ३८.८, वारला ३६.८, केकतउमरा ४१, पार्डी आसारे ३१.८, वाकद ३९.८, इंझोरी ४९, धनज बुद्रुक ५२.५.

अतिवृष्टी झालेली मंडले

जळगाव ८७.३, चिखली ६१, कोलारा ७५, पाडळी ९५, देऊळघाट ९५, अंजनी बुद्रुक ८८.५, नायगाव दत्तापूर ८८.५, कल्याणा ७५.३, वझर ७९, शेगाव ८४.५, मलकापूर ७२.३, धरणगाव ७२.३, घुसर ६५.५, सांगळूद ६५.५, कुरणखेड ६७, शेलूबाजार ८४, जामठी ६५, मूर्तिजापूर ६६.३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT