Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील ३७ मंडलात अतिवृष्टी

Latest Rain Update Maharashtra : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ३७ मंडलात गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासात अतिवृष्टी झाली. लातूर जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला.

Team Agrowon

Chhatarpati Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ३७ मंडलात गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासात अतिवृष्टी झाली. लातूर जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. त्या पाठोपाठ नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव व जालना जिल्ह्यातील अनेक मंडलांमध्ये पावसाचा अनुक्रमे जोर पाहायला मिळाला.

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांमध्ये जालन्यातील दोन मंडलाचा अपवाद वगळता सर्व दूर पावसाची तुरळक हलकी मध्यम ते दमदार हजेरी लागल्याचे पाहायला मिळाले.

अतिवृष्टी झालेल्या मंडलांमध्ये लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक १०, त्या पाठोपाठ नांदेडमधील आठ, बीडमधील सहा, परभणीतील चार, हिंगोली व छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येकी तीन, धाराशिवमधील दोन व जालन्यातील एका मंडलाचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, सोयगाव, वैजापूर या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक होता. त्या पाठोपाठ पैठण, सिल्लोड, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर व कन्नड तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात पावसाचा जोर तुलनेने अधिक दिसला. इतर तालुक्यांमध्ये १२ ते २४ मिलिमीटर दरम्यान सरासरी पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील आष्टी, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, केज, वडवणी, शिरूर कासार या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक राहिला.

केज, अंबाजोगाई, शिरूर कासार तालुक्यांमध्ये सरासरी ४० मिलिमीटरच्या पुढे तर माजलगाव तालुक्यात सरासरी ६३ मिलिमीटरच्या पुढे पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील उदगीर, देवणी, जळकोट तालुक्यात सरासरी ५० मिलिमीटरच्या पुढे तर लातूर, शिरूर अनंतमाळ तालुक्यात सरासरी ४५ मिलिमीटरच्या पुढे पाऊस झाला. इतर तालुक्यात पावसाची सरासरी २२ मिलिमीटरच्या पुढेच राहिली.

धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात सरासरी ४० मिलीमीटरच्यापुढे तर धाराशिव, भूम, कळंब, वाशी या तालुक्यांमध्ये सरासरी २६ ते ३६ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. लोहारा तालुक्यात सरासरी ११.८ तर उमरगा तालुक्यात सरासरी ५.२ मिलिमीटर म्हणजे सर्वात कमी पावसाची सरासरी नोंदल्या गेली.

सर्व दूर झालेल्या पावसाच्या आगमनाने रखडलेल्या पेरण्यांना गुरुवारी गती मिळाली. काही मंडलांमध्ये दमदार ते जोरदार बसणारा पाऊस काही मंडलांमध्ये मात्र तुरळक हलका ते मध्यम स्वरूपाचाच बरसला. केवळ अपवाद वगळता सर्वदूर लागलेली पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेली आहे.

जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडळ (पाऊस मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर

वैजापूर ७०.२५

बाबतारा ८०.७५

बाबरा ६५.७५

जालना

अंबड ७०.५०

बीड

युसूफ वडगाव १०८

होळ ७९

गंगामसला १३२

माजलगाव ८६

सिरसदेवी ७७.७५

कडा १२०.५०

लातूर

लातूर ७६.२५

बाभळगाव ७६.२५

हरंगुळ ७६.२५

किनी ९१

शिरूर ताजबंद ६८

नागलगाव १२६.५०

मोघा ११२.२५

चाकूर ६९.२५

बोरोळ ७५.५०

जळकोट ७३

धाराशिव

जवळा ७०.२५

भूम ६८

नांदेड

आदमपूर ९२.७५

मुखेड ६६.७५

जांब ८४.२५

येवती ८६

जहूर ८६

चांडोळा ७१

अंबुलगा ८६

माळाकोळी ७१

परभणी

केडगाव ६८.७५

जांब ६८.७५

केसापुरी ७२.५०

ताडबोरगाव ६८.७५

हिंगोली जिल्हा

माळहिवरा ६७.२५

वसमत ९१.७५

हयातनगर ९१.७५

पावसामुळे बोरनदी दुथडी भरून वाहू लागली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात सलग दोन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे बोरनदी दुथडी भरून वाहू लागली. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर मधील १८ मंडलात ३४ ते ६१ मिलिमीटर दरम्यान जालना जिल्ह्यातील ११ मंडलात ३० ते ५४ मिलिमीटर दरम्यान, बीड जिल्ह्यातील एकोणीस मंडलात ३० ते ६४ मिलिमीटर दरम्यान, लातूर जिल्ह्यातील २२ मंडलात ३० ते ६४ मिलिमीटर दरम्यान तर धाराशिव जिल्ह्यातील १४ मंडलात ३० ते ५८ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT