Maharashtra Rain Update : राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Maharashtra Monsoon News : कोवळ्या पिकांना जीवदान; खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

टीम ॲग्रोवन
State Rain Update : पुणे : यंदा पावसाळा लांबला, यातच पूर्वमोसमी पावसानेही पुरेशी हजेरी लावली नाही. मॉन्सून दाखल झाल्यानंतरही कोकण, पूर्व विदर्भ वगळता अनेक भागात पेरणी योग्य पाऊस झाला नाही.

मात्र, पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना बुधवारी (ता. ५) काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाने कोवळ्या पिकांना दिलासा मिळाला असून, खरिपाच्या पेरण्यांना काही अंशी वेग येणार आहे.

गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. कोकणासह, मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक होता. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. कोकणात गेले काही दिवस संततधार पाऊस सुरू आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सतत पडणाऱ्या पूरस्थितीची शक्यता आहे. बुधवारी (ता. ५) पहाटेपासून सर्व भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. जिल्ह्यातील गडनदी, जानवली, कर्ली, तिलारी, शुकनदी या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. रत्नागिरी, पालघर जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

Rain
Rain Update : सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

अकोला जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दिलासादायक हजेरी लावली. या पावसामुळे आता खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. बुधवारी (ता. ५) अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी, अकोला, पातूर, मूर्तिजापूर, आदी तालुक्यांत पावसाच्या सरी पडल्या. वाशीम जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर या तालुक्यांतील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस झाल्याने दिलासा मिळाला आहे.

Rain
Rain Update : सर्वदूर पावसाची शक्यता

परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम होता. गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. दोन्ही जिल्ह्यांच्या काही मंडळांत अतिवृष्टी झाली. अनेक मंडलांत अत्यंत हलका पाऊस झाला. चार मंडलांतील अनेक गावांत पावसाने हुलकावणी दिली.
नांदेड जिल्ह्यात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. किनवट, माहूर व हिमायतनगर तालुके वगळता उर्वरित सर्वच तालुक्यांत जोरदार पाऊस झाल्याने खरिपातील पेरण्यांच्या कामांना पुन्हा सुरुवात झाली आहे. पावसामुळे लोहा व बिलोली तालुक्यांतील प्रत्येक एका मंडलासह मुखेडमधील सहा मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. विलंबाने का होईना दमदार पावसाने शेतकरी सुखावला आहे.

खानदेशात बुधवारी (ता. ५) सकाळी व रात्री अनेक भागात जोरदार व मध्यम पाऊस झाला. काही भागात तुरळक पाऊस आहे. जळगाव जिल्ह्यात यावल, जामनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, साक्री भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रातील कोवळे कोंबांना दिलासा मिळाला आहे. पावसाचे आगमन झाल्याने रखडलेल्या पेरण्यांना गती येणार आहे.
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, पूर्व भागातील शिरूर, इंदापूर, दौंड, बारामती, सासवड भागात हजेरी लावली आहे. पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी पावसाचा जोर नसल्याने पेरण्या खोळंबल्याची स्थिती आहे.

गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण :

वैभववाडी १८०, राजापूर, पालघर प्रत्येकी १५०, रामेश्वर १४०, कुडाळ, कणकवली प्रत्येकी १३०, देवगड १२०, मुलदे, सावंतवाडी प्रत्येकी ११०, मालवण प्रत्येकी ९०, दोडामार्ग ८०, सांताक्रूझ, वसई प्रत्येकी ७०, श्रीवर्धन ६०, लांजा, संगमेश्वर प्रत्येकी ५०.

मध्य महाराष्ट्र :
गगणबावडा १२०, साक्री, राहुरी ६०, श्रीगोंदा, सटाणा, जळगाव प्रत्येकी ५०, चाळीसगाव, चंदगड, नंदूरबार, राधानगरी, एरंडोल, यावल, सोलापूर, धाडगाव प्रत्येकी ४०, आजरा, भुसावळ, धरणगाव, शाहूवाडी प्रत्येकी ३०.

मराठवाडा :
मुखेड ११०, कळंब, उदगीर प्रत्येकी १००, बिलोली, जळकोट प्रत्येकी ९०, चाकूर, बीड, भूम प्रत्येकी ८०, रेणापूर, उमरी, देगलूर प्रत्येकी ७०, औसा, वाशी, घनसंवगी, माणवत, माजलगाव, आष्टी, उदगीर, पातूर प्रत्येकी ६०, शिरूर अंनतपाळ, सोयगाव, निलंगा, पुर्णा, परभणी, देवणी, वैजापूर, वसमत प्रत्येकी ५०.

विदर्भ :
मलकापूर ५०, सिंदखेड राजा, लोणार, मोताळा प्रत्येकी ४०, मालेगाव, चंदूरबाजार, खामगाव, धारणी, परतूर, चिखली प्रत्येकी ३०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com