Crop Damage Compensation Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीची नुकसान भरपाई लवकरच मिळण्याची शक्यता

बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. जमिनही खरडून गेली होती.

Team Agrowon

Buldhana Crop Damage ः अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने जाहीर करूनही केवळ माहिती अपडेट होत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. काही कर्मचारी संघटनांकडून माहिती अद्ययावत करण्याच्या कामास असहकार्य केले जात असल्याने प्रशासनापुढे पेच तयार झालेला आहे.

दुसरीकडे मंगळवारी (ता. ७) याबाबत बैठक घेत जिल्हाधिकारी डॉ. ह. पी. तुम्मोड (Collector Dr. h. P. Tummod) यांनी संघटनांना या कामाबाबत शुक्रवार (ता.१७) पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. संघटनांकडून हे काम करण्याबाबत होकार मिळाल्याने शेतकऱ्यांचा रखडलेला पैसा खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. जमिनही खरडून गेली होती. यासाठी शासनाने मदतीची घोषणा केली. जिल्ह्यातील लाखावर शेतकऱ्यांना मदतीसाठी सुमारे १७४ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.

ही रक्कम थेट शासनाकडून खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी ग्रामसेवक, कृषी सहायक व तलाठी यांच्याकडे माहिती अद्ययावत करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने सोपवली होती.

मात्र, आपल्याकडील कामाचा ताण पाहता तसेच हे काम महसूल यंत्रणाच आजवर करीत आलेली असल्याने ग्रामसेवक संघटनेने नकार दर्शवला होता. यातून काही तालुक्यात ग्रामसेवकांकडील माहिती अद्यापही अद्ययावत झालेली नाही.

शासनाने शेतकऱ्यांसाठी मदत देण्यासाठी घोषणा करूनसुद्धा केवळ माहितीअभावी ही रक्कम खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे. यात जवळपास दोन महिन्यांपेक्षा अधिक विलंब झालेला आहे.

या मुद्द्यावर संघटनांची मंगळवारी (ता. ७) बैठक घेतली. त्यात त्यांना काम वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना दिली आहे. या कामासाठी १७ फेब्रुवारीची मुदत नेमून दिली.
डॉ. ह. पी. तुम्मोड, जिल्हाधिकारी, बुलडाणा
सप्टेंबर-ऑक्टोबरमधील अतिवृष्टीची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिली जाणार आहे. यासाठी माहिती अपग्रेडेशनचे काम सुरू होते. संघटनांच्या मुद्द्यांवर तोडगा निघाला असून हे काम आता जोमाने पुढे जाणार आहे.
एस. जी. डाबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT