Kharif Season Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Crop Harvesting : खरीप पिकांच्या काढणी, मळणीची कामे वेगात

बाजरी, भुईमूग, सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान

Team Agrowon

पुणे : गेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने (rain) उघडीप दिली आहे. पावसानंतर रब्बीसाठी शेतीच्या मशागतीच्या, तर खरीप हंगामातील (Kharif season) पिकांच्या काढणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यामध्ये बाजरी, सोयाबीन, भुईमूग या पिकांच्या काढणीच्या व मळणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. तर रब्बी हंगामासाठी (Rabi season) शेताची मशागतीला वेग आला आहे.

जिल्ह्यात खरिपाचे एक लाख ९५ हजार ७१० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एक लाख ९६ हजार ३१५ हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसाने बाजरीचे पीक खराब झाले. भुईमूग, सोयाबीन पिकांची पेरणी झाली होती; परंतु त्यातील पिके हाती लागली नाहीत. शेतकऱ्यांच्या हातात आता काही उरले नाही. निथळ जमिनीतील पिकांचे उत्पन्न काहीसे हाती लागले आहे.

उत्पन्न घटले

अति आणि सततच्या पावसामुळे बाजरी सोयाबीन आणि भुईमुगाचे उत्पन्न घटले आहे. तर बाजरी पावसामुळे आडवी पडून कणसांमध्ये दाणे अंकुरले आहेत. तर सोयाबीन आणि आणि भुईमूग काढणी उशिरा झाल्याने तेही उगवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामना करावा लागत आहे.

निसर्गाच्या अनियमिततेमुळे नुकसान

दिवाळी उलटून गेली तरीही जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरु झालेली नाही. थोड्याफार प्रमाणात उथळ क्षेत्रात व कमी पाणी असलेल्या क्षेत्रांमध्ये मशागतीची कामे सुरू आहेत; परंतु गहू, हरभरा, ज्वारी पेरणीला दिरंगाई होत असल्याची स्थिती आहे.

त्यामुळे खरीप हंगाम यंदा उशिरा संपला आणि रब्बी हंगाम उशिरा सुरू झाला आहे. निसर्गाच्या अनियमिततेमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Latur APMC : लातूर बाजार समिती होणार ‘राष्ट्रीय बाजार’

MSP Procurement Center : आधारभूत खरेदी केंद्रांची संख्या वाढवा ः अमोल येडगे

PM Kisan 21st Installment Date: शेतकऱ्यांना दिवाळीत पीएम किसानचा २१ वा हप्ता मिळेल का?; तपासा तुमचे लाभार्थी स्टेटस

Crop Insurance Payment : सिंधुदुर्गात बागायतदारांना विमा वितरणास सुरुवात

Crop Damage Survey : पीकहानीचे पंचनामे सुरूच; कमी मनुष्यबळाचा परिणाम

SCROLL FOR NEXT