Paddy Farming  Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Farming : पावसाअभावी भात रोपांची वाढ खुंटली

Kharif Season : यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने त्याचा परिणाम भातशेतीवर झाला आहे. मुरबाड तालुक्यात या वर्षी भाताच्या रोपांची वाढच खुंटली आहे.

Team Agrowon

Kharif Paddy Plantation : यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने त्याचा परिणाम भातशेतीवर झाला आहे. मुरबाड तालुक्यात या वर्षी भाताच्या रोपांची वाढच खुंटली आहे. त्यातच आता दुबार भातपेरणी करणे शक्य नाही. त्यामुळे ३० ते ४० टक्के भातशेती ओसाड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जून महिन्यात पाऊस दाखल झाला. त्यानंतर मात्र पावसाची संततधार सुरूच राहिली. यामुळे रोपांची उगवण क्षमता कमी झाली. काही शेतकऱ्यांनी पाऊस उशिरा आल्याने दुबार पेरणी केली होती; परंतु तीदेखील वाया गेल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनसुद्धा रोपे कमी उगवली आहेत.

मुरबाड तालुक्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. पूर्वी माळरानावर किंवा शेतात राबणी करून तेथे भाताची पेरणी केली जात होती; परंतु आता मजूर मिळत नाहीत.

यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार भातपेरणी करूनही रोपे कमी उगवली नाहीत. आता पुन्हा पेरणी केली, तरी भातरोपे उगवली नाहीत. आता त्या शेतांमध्ये इतर कुठल्याही पिकाची लागवड करणे शक्य नाही,
- शंकर कोर, माजी सरपंच, आसोले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gram Sowing : खानदेशात हरभरा पेरा स्थिर राहण्याचे संकेत

BBF Technology : बीबीएफ तंत्रज्ञान उपयुक्त : डॉ. मायी

Crop Subsidy : कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ३० हजार, बागायतीसाठी ७० हजार रुपये अनुदान द्या

Farmer Crisis : करपलेल्या ४० एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

SCROLL FOR NEXT