Bendur Festival Agrowon
ताज्या बातम्या

Bendur Festival : बेंदूर सणानिमित्त मांडकीत ट्रॅक्टरची भव्य मिरवणूक

Mandaki Bendur : मांडकी येथे बेंदूर सणानिमित्त बैलांप्रमाणेच, ट्रॅक्टरला फुगे, रंगीबेरंगी पट्ट्या, फुलांचे हार, तसेच गुलाल लावून सजविण्यात आले होते. बैलजोडीसह, ट्रॅक्टरची मिरवणूक सोमवारी (ता. ३) काढण्यात आली.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Tractor Rally : वाल्हे : सध्याच्या यांत्रिक युगात बैलांचे प्रमाण कमी होत असून, त्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे.

पुरंदर तालुक्यातील बागायती गाव म्हणून ओळख असलेले मांडकी येथे बेंदूर सणानिमित्त बैलांप्रमाणेच, ट्रॅक्टरला फुगे, रंगीबेरंगी पट्ट्या, फुलांचे हार, तसेच गुलाल लावून सजविण्यात आले होते. बैलजोडीसह, ट्रॅक्टरची मिरवणूक सोमवारी (ता. ३) काढण्यात आली.

सोमवारी (ता. ३) बेंदूरनिमित्त ४५ ते ५० ट्रॅक्टर, १५ बैलजोड्या, तसेच जेसीबी यांची डीजेच्या तालावर, गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये शेतकऱ्यांसह तरुण, वृद्ध यांनी उस्फूर्त सहभाग घेतला.

बेंदूर या दिवशी बैलांना सजवून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. मात्र सध्याच्या यांत्रिक युगात बैलांच्या कमतरतेमुळे ट्रॅक्टरने शेतीच्या मशागत केली जाते. मांडकी येथे मागील वर्षांपासून ट्रॅक्टरमालकांकडून एकत्रित येऊन ट्रॅकरची मिरवणूक काढली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cold Wave: धुळे, जळगावात थंडी परतली

Maize Armyworm: लष्करी अळी नियंत्रणात परजीवी ‘टेलेनोमस रेमस’चे महत्त्व

Group Development Officer: घनसावंगीत दोन महिन्यांत बदलले चार गटविकास अधिकारी

China Agricultural: शेतीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी चीनची नवी रणनीती

Labour Shortage: मजुरांच्या टंचाईमुळे तूर काढणीसाठी हार्वेस्टरकडे कल

SCROLL FOR NEXT