Jalna News: घनसावंगी तालुक्यात मंजुरांची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे शेतकरी हार्वेस्टरच्या माध्यमातून तुरीची काढणी करीत आहेत. यामुळे श्रम आणि खर्चाचीही बचत होत असल्याने हार्वेस्टरकडे कल वाढत चालला आहे. .यंदाच्या खरीप हंगामात घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड करण्यात आली आहे. हंगामाच्या सुरवातीपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे तूर पीक जोमत आहे. शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीन पिकामध्ये आंतरपीक म्हणून तूर घेतली आहे. सध्या हे पीक काढणीसाठी आले असून त्यासाठी आवश्यक मजूर मिळणे अत्यंत कठीण झाली आहे. .Labour Shortage : मजुरांच्या तुटवड्यामुळे इर्जिक पद्धतीने कोळपणी.ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध होत नाही तिथे प्रतिक्विंटल ५०० ते ६०० रुपयांप्रमाणे मजुरांची मागणी केली जात आहे. एका एकरातील तूर काढण्यासाठी सुमारे दहा मजूर लागतात. त्यामुळे केवळ मजुरीवरच ५००० पर्यंत खर्च होतो. .Labour Migration: मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी सोयगावात १२० कामे मंजूर.त्यात मळणी यंत्र वाहतूक व इतर खर्च धरल्यास एकूण खर्च दहा हजार रुपयांच्या आसपास पोचतो. त्यामुळे हा वाढता खर्च सद्यःस्थितीत शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर हार्वेस्टरचा वापर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. कमी वेळात, कमी खर्चात आणि मजुरावरील अवलंबित्व कमी करत तूर काढणे शक्य होत आहे..एका एकरात सात हजार रुपयांची चतएक एकरातील तूर पिकाची सोंगणी करण्यासाठी हार्वेस्टरला अवघा अर्धा तास लागत आहे. यासाठी साधारण तीन हजार रुपयांचा खर्च येतो. याउलट मजूर व मळणीयंत्राच्या साह्याने काढणी केल्यास दहा हजार रुपयांपर्यंत खर्च येत असल्याने शेतकऱ्यांची सुमारे सात ते साडेसात हजार रुपयांची बचत होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.