Onion Rate Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate : ‘कांदा दरामध्ये सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा’

कांद्याचे विक्रीदर कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याला २२०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल मिळत होता.

Team Agrowon

Onion Market Update पुणे : कांद्याचे विक्रीदर (Onion Rate) कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याला २२०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल मिळत होता.

या वर्षी मात्र हे दर ५०० ते ६०० रुपयांपर्यंत खाली कोसळले आहेत. राज्य शासनाने या पार्श्‍वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादकांना (Onion Farmer) सहकार्य करावे.

राज्यकर्त्यांच्या भूमिकांचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत असल्याचे, किसान सभेने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती किसान सभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे यांनी दिली.

फिलिपिन्स, थायलंडमध्ये कांद्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. या देशांबरोबर संवाद साधून आपल्याकडील कांदा रास्त दरामध्ये या देशांना पाठविता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

तसेच देशांतर्गत बिगर कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांदा पोहोचविण्यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

पाकिस्तानबरोबर बिघडलेल्या संबंधामुळे पाकिस्तानला होणारी कांदा निर्यात ठप्प झाली आहे. पाकिस्तानला सध्या दुबईमार्गे कांदा जात आहे. दुबईबरोबर हिंदुस्थानचा व्यापार काही कारणांमुळे तणावग्रस्त झाला आहे.

दुबईला होणारी कांदा निर्यात बंद आहे. निर्यात सुरू झाल्यास कांद्याचे देशांतर्गत दर स्थिर करण्यास मोठी मदत होणार आहे.

केंद्र सरकारने याबाबत पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या खुल्या पत्रात किसान सभेच्या वतीने केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT