Ambadas Danve Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Suicide : शेतकरी आत्महत्या वाढविणे हे सरकारचे धोरण ः दानवे

आत्महत्यामुक्‍त राज्य करू, असे अभिवचन देणारे सरकार आता शेतकरी आत्महत्या वाढविण्याचे धोरण राबवीत आहे,’’ असा आरोप विधान परिषदेचे विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

टीम ॲग्रोवन

भंडारा ः ‘‘आत्महत्यामुक्‍त राज्य (Farmer Suicide Free State) करू, असे अभिवचन देणारे सरकार आता शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) वाढविण्याचे धोरण राबवीत आहे,’’ असा आरोप विधान परिषदेचे विरोध पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला.

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्‍यातील कोंढा कोसरा परिसरात अतिवृष्टी व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची दानवे यांनी भेट घेतली. त्यानंतर भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी नरेश डहारे, जिल्हाप्रमुख संजय रेहपांडे आदी उपस्थित होते.

दानवे म्हणाले, ‘‘भंडारा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अतिवृष्टी, पुरामुळे धानपीक अक्षरशः सडून गेले आहे. आजही शेतशिवारात दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. परंतु हे सरकार झोपल्याचे सोंग घेऊन आहे.

शेतकरी आत्महत्या वाढत असताना कृषिमंत्री फक्‍त घोषणा करून मोकळे होत आहेत. कृषिमंत्र्यांनी तीन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र लाभार्थ्यांच्या खात्यात तीन रुपयेही आले नाहीत.’’

‘सरकार सर्वच स्तरावर फेल’

‘‘नुकसानग्रस्तांना मदत करण्याऐवजी वेळ मारुन नेली जात आहे. राज्यात सर्वत्र अशीच स्थिती आहे. ठाकरे सरकारशी गद्दारी करून स्थापन केलेले हे सरकार सर्वच स्तरावर सपशेल फेल ठरले आहे,’’ असा टोला दानवे यांनी लगावला. ‘‘राज्यात गत अडीच महिन्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. असे असताना राज्यात सरकार आहे की नाही, अशी स्थिती आहे,’’ अशी टीका देखील त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT