Farmer Strike : ‘अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी’

अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी क्रांती संप गोरेगावतर्फे शुक्रवार (ता.१६) पासून गोरेगाव येथे आंदोलन सुरू आहे.
Farmer Strike
Farmer StrikeAgrowon
Published on
Updated on

हिंगोली ः जिल्ह्यातील अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांच्या (Heavy Rain Affected Farmer) विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता. २१) शेतकरी क्रांती संप (Shetakri Kranti Samp) गोरेगावतर्फे विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Agitation Hingoli) करण्यात आले.

Farmer Strike
Crop Damage Survey : नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी क्रांती संप गोरेगावतर्फे शुक्रवार (ता.१६) पासून गोरेगाव येथे आंदोलन सुरू आहे. अतिवृष्टीच्या मदतीत सर्व शेतकऱ्यांचा तत्काळ समावेश करावा. सर्व शेतकऱ्यांना सरसकट विमा लागू करावा. कोरोना काळात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करावे.

Farmer Strike
Crop Damage Survey : नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा

वीजबिल माफ करावे. वीजबिलाची वसुली थांबवावी आदी मागण्या पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांनी भाजीपाला, दुधाची विक्री करू नये, असे आवाहन शेतकरी क्रांती संपतर्फे करण्यात आले आहे.

बुधवारी (ता.२१) सकाळी गोरेगाव येथे रस्त्यावर दूध फेकून देत शासनाचा निषेध करण्यात आला. त्यानंतर दुपारी कन्हेरगाव नाका, पानकन्हेरगाव, हिंगोली, डोंगरकडा आदी ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com