Gokul Milk Rate agrowon
ताज्या बातम्या

Gokul Milk Rate : 'गोकुळ'कडून म्हैस दूध उत्पादकांना दिलासा तर गाय पशुपालकांना धक्का

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून म्हैस दूध खरेदी दरात वाढ केली आहे तर गायीच्या दूध दरात कपात केली आहे.

sandeep Shirguppe

Gokul Milk News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे. म्हैस दूध ५.५ फॅट ते ६.४ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रुपये १ ने दूध खरेदी दरात वाढ केली आहे.

तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी दिली.

ही दूध दरवाढ ०१ ऑक्टोबर २०२३ पासून दुध पुरवठा करणाऱ्या जिल्ह्या व जिल्ह्याबाहेरील दुध उत्पादकांना लागू होणार आहे. तर गाय दूध खरेदी दरामध्ये २ रुपये कपात करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रमध्ये खाजगी व इतर दूध संघांचे गाय दुधाचे खरेदी दर कमी झाले आहेत.

बाजारपेठेतील दुध पावडर, बटर, लोणी यांचे दर कमी झाले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून गाय दूध खरेदी दर कमी करणेत येत असल्याची माहिती अध्यक्ष डोंगळे यांनी दिली.

म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रुपये ४९.५० वरून रूपये ५०.५० करण्यात आला आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रूपये ५१.३० वरून रूपये ५२.८० करण्यात आला. गाय दुधामध्ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर गाय दूध खरेदी दर ३५.०० रूपये वरून ३३.०० रूपये करण्यात आला आहे.

नवे दर असे (कंसात जुने दर रुपयात)

म्हैस दूध - ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिलिटर ५०. ५० रुपये (४९.५०)

६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ करिता प्रतिलिटर ५२.८० (५१.३०)

गाय दुधामध्‍ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करिता प्रतिलिटर- ३३ (३५)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू दरात सुधारणा, उडीद दर टिकून, बटाटा बाजारात चढ-उतार, पेरू दरात तेजी, चिकू दरात चढ-उतार

Shri Mangal Wheat: ‘श्री मंगल’ गव्हाचा नवा वाण ; हेक्टरी ५२ क्विंटल उत्पादनाची क्षमता

Crop Damage Survey: अहिल्यानगरला साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण

Shivraj Singh Chouhan: काँग्रेसच्या सलग पराभवाला कारण कोण? शिवराज सिंह चौहान यांचा राहुल गांधींवर निशाणा

Monsoon Return: देशाच्या उर्वरित भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती; राज्यात उन्हाचा चटका कायम

SCROLL FOR NEXT