Gokul Milk Chairman agrowon
ताज्या बातम्या

Gokul Milk Kolhapur : 'लम्पी'मुळे शेतकरी संतापले; गोकुळचे चेअरमन, संचालकांना दौरा सोडून जाण्याची वेळ

Team Agrowon

Lumpy Disease : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, भुदरगड, कागल तालुक्यात लम्पीमुळे जवळपास २५ जनावरे दगावली आहेत. दरम्यान लम्पी आजारावर नियंत्रण मिळवण्यावर जिल्हा पशुसंवर्धन विभाग पूर्णपणे फोल ठरला आहे. तर राज्यात नावारूपास असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध (गोकुळ) संघाने जनावरांच्या जीवघेण्या लम्पी आजाराकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप दूध उत्पादकांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान संतापलेल्या शेतकऱ्यांनी 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे व संचालक नंदकुमार ढेंगे यांना धारेवर धरत जाब विचारला. अचानक शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने चेअरमन डोंगळे व संचालक ढेंगे यांना पाहणी दौरा अर्धवट सोडून जाण्याची वेळ आली.

लम्पीच्या आजाराने भुदरगड तालुक्यातील कुर, कोनवडे, निळपण, दारवाड, बसरेवाडी, म्हसवेसह अनेक गावांत संसर्ग वाढला आहे. तर मागच्या काही दिवसांपूर्वी राशिवडे या गावातील जवळपास १५ जनावरे दगावली होती तर कागल तालुक्यातील ही काही जनावरांना फटका बसला होता. जिल्ह्यात अंदाजे ३०० शेतकऱ्यांच्या जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यामुळे शेतीला असलेला जोडधंदा अडचणीत आल्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहेत.

दूध व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून संसार कसा चालवायचा याची विवंचना लागून राहिली आहे. तालुक्यातील बहुतांशी दूध पुरवठा 'गोकुळ'कडे असताना दूध संघाने मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष केले असल्याचा आरोप दूध उत्पादकांनी केला.

लम्पीबाबत शेतकऱ्यांची विचारपूस करण्यास आज चेअरमन अरुण डोंगळे व संचालक नंदकुमार ढेंगे आले असता शेतकऱ्यांनी त्यांना विविध प्रश्न विचारून भंडावून सोडले. 'गोकुळ दूध संघ आमची काळजी घेत नसेल तर आम्हाला दुसरा पर्याय शोधावा लागेल. पशुखाद्य, मिनरल मिक्स्चर याचबरोबर वैद्यकीय सेवा मिळत नाही.

तुम्ही आणि तुमचे अधिकारी काय करतात?, अशा संतप्त प्रतिक्रिया चंद्रकांत मोहिते, अरूण राजीगरे, जीवन मिटके, अमर राजीगरे, सुरज मोहिते, तानाजी कदम, सुभाष मोहिते, दत्तात्रय टोणपे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Edible Oil Rate : तीस लाख टन साठा संपेपर्यंत खाद्यतेलाच्या किमती वाढवू नका

Vasantdada Sugar : ‘वसंतदादा शुगर’च्या धर्तीवर चालणार सिट्रस इस्टेटचा कारभार

Shwetkranti 2.0 : केंद्रीय मंत्री शहांच्या हस्ते ‘श्‍वेतक्रांती २.०’चा प्रारंभ

Bioenergy Production : जैवऊर्जा निर्मितीचा पहिला टप्पा फसला

Monsoon Update : मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती

SCROLL FOR NEXT