Godrej Jersey Agrowon
ताज्या बातम्या

Godrej jersey : गोदरेज जर्सी करणार महाराष्ट्रातून दूध संकलन

मध्यपूर्वेतील तुपाच्या बाजारपेठेवर लक्ष ठेऊन निर्यात वाढवण्यासाठी हा विस्तार करण्यात येतोय.

टीम ॲग्रोवन 

गोदरेज ऍग्रोव्हेटची गोदरेज जर्सी (Godraj Agrovate) कंपनी आता महाराष्ट्रात दुग्धव्यवसायाचा विस्तार करणार आहे. मध्यपूर्वेतील तुपाच्या बाजारपेठेवर लक्ष ठेऊन निर्यात वाढवण्यासाठी हा विस्तार करण्यात येतोय. यावर गोदरेज जर्सीचे सीईओ भूपेंद्र सुरी (Bhupendra Suri) म्हणाले की,

"तेलंगणामध्ये दुधाचा तुटवडा असल्याने आम्ही हैदराबादच्या जवळच्या भागात मोठ्या प्रमाणात दूध संकलन करण्याच्या प्रयत्नात होतो. त्यामुळेच आम्ही महाराष्ट्राची निवड केली आहे."  ते पुढे म्हणाले की, "सध्या आम्ही दिवसाला 80,000 लिटर दुधाचं संकलन करायला सुरुवात केली आहे.

मागच्या वर्षी हेच संकलन दिवसाला 15,000 लिटरच्या आसपास होतं. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात दूध संकलन केंद्र उघडली."  हे संकलन आणखीन वाढण्याची आमची अपेक्षा आहे असंही त्यांनी सांगितलं. दक्षिणेकडील तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये 10 मिल्क प्रोसेसिंग युनिट चालवणाऱ्या गोदरेज जर्सीचे महाराष्ट्रात नागपूर मध्ये एक युनिट आहे.

कंपनी दररोज 6.5 ते 7 लाख लिटरच्या आसपास मिल्क प्रोसेसिंग करते. तर या युनिटची प्रोसेसिंग कपॅसिटी 13 लाख लिटर इतकी आहे. कंपनीच्या एकूण विक्रीत दुधाचा वाटा 67 टक्के इतका आहे. तर उर्वरित वाटा हा दुधापासून तयार होणाऱ्या उत्पादनाचा आहे.

कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे दुग्धजन्य पदार्थांचा महसुलातील हाच वाटा पुढच्या काही वर्षांमध्ये वाढून 40 टक्क्यांच्या आसपास जाईल. कंपनी यूएचटी (टोण्ड मिल्क), फ्लेवर्ड दूध आणि तूप यांसारख्या उत्पादनाची विक्री वाढवण्यावर भर देत आहे. 

यावर सुरी म्हणाले की, "हे उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही 20 कोटींची गुंतवणूक करीत आहोत जेणेकरून आमची क्षमता चार पटीने वाढेल." गोदरेज जर्सी विदेशी बाजारपेठेत आपला जम बसवण्याच्या तयारीत आहे.

तसेच या बाजारपेठेत तुपाची निर्यात करता येईल का याची संधी शोधत आहेत.  यावर कंपनीचे सीईओ सुरी म्हणतात की,  "आम्ही मालदीव, दुबई आणि यूएई सारख्या बाजारपेठांमध्ये तूप निर्यात करण्याचा प्रयत्न करत आहोत. तिकडे तुपाच्या किंमतीही जास्त आहेत.  ही एक मोठी बाजारपेठ आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT