Ganpatrao Deshmukh  Agrowon
ताज्या बातम्या

Ganpatrao Deshmukh : गणपतराव देशमुखांच्या स्मारकाचे सांगोल्यात उद्या अनावरण

Sharad Pawar : महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या स्मारकाचे अनावरण श्री. पवार यांच्या हस्ते होणार आहे.

Team Agrowon

Solapur News : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळ्यासाठी रविवारी (ता. १३) सांगोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे रविवारी दुपारी एकच्या सुमारास महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या स्मारकाचे अनावरण श्री. पवार यांच्या हस्ते होणार आहे. पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमानंतर शरद पवार व देवेंद्र फडणवीस सांगोल्यात एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

या कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत.

ब्रांझधातूचे स्मारक

महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या देशमुख यांच्या या स्मारकाचे वजन ६०० किलो असून, ते संपूर्ण ब्रांज धातूपासून बनवण्यात आले आहे. स्मारकाची उंची साडेआठ फूट असून त्याची उभारणी गजानन सलगर (मिरज) यांनी केली आहे.

पवार साधणार सेंद्रिय शेती करणाऱ्यांशी चर्चा

महाविद्यालयाच्या प्रांगणात देशमुख यांच्या स्मारक अनावरणाच्या कार्यक्रमानंतर दुपारी साडेचार वाजता श्री. पवार हे महाऑरगॅनिक अॅण्ड रेसिड्यु फ्री असोसिएशन (मोर्फा) यांच्या वतीने सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी हर्षदा लॅान्स येथे चर्चा कऱणार आहेत, यात सेंद्रिय शेतीतील अडचणी आणि त्यावरील उपायांवर चर्चा होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Forecast: पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज

Organic Farming Subsidy: सेंद्रिय शेतीसाठी सरकारकडून मिळणार ६ लाखांपर्यंत अनुदान! जाणून घ्या योजनेची माहिती

Crop Insurance Protest : पीकविम्याच्या मुद्यावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आणखी एक महत्वाचा पुरावा; देवी लसीकरण नोंदीचा वापर करण्याची शिंदे समितीची शिफारस

Panand Road : सहमतीमुळे देवबावाडी पाणंद रस्ता झाला खुला

SCROLL FOR NEXT