Department of Food Safety of India : भारतीय अन्न सुरक्षा विभागाकडून मागच्या काही काळात सुक्ष्म, लघू आणि मध्यम खाद्य उद्योग करणाऱ्या कंपण्यावर काही नियम लादले होते. यावर आता भारतीय अन्न सुरक्षा विभागाने युटर्न घेतला आहे.
लहान अन्नपदार्थ बनवून व्यवसाय त्याची परवानगी घ्यावी लागते. यासाठी खाद्य व्यवसाय ऑपरेटरर्स अंतर्गत तयार केलेल्या उत्पादनांची चाचणी करण्याची मागणी करणारा आदेश मागे घेण्याची सहमती दर्शविली आहे.
अन्न सुरक्षा विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे अनेक लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागायचे. यावर FSSAI ने हा आदेश मागे घेत काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
अन्न चाचणी करण्यासाठी खाद्य उत्पादकांकडून खर्च होत असल्याने मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यामुळे आम्ही सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग करणाऱ्या लोकांचा विचार लक्षात घेता हा आदेश मागे घेत आहोत.
तसेच हा निर्णय मागे घेतला असला तरी यावर काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत त्याप्रमाणे खाद्य पदार्थ बनवावे अशी माहिती FSSAI चे अधिकारी विश्वेश्वर भट यांनी माहिती दिली.
विश्वेश्वर भट यांनी अलायन्स फॉर सस्टेनेबल अँड होलिस्टिक अॅग्रीकल्चर (आशा) या संस्थेला याबाबत माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, जो काही आदेश काढला होता तो मागे घेतल्याने खाद्य उत्पादक कंपन्यांचे अतिरिक्त काम कमी होईल असे भट म्हणाले.
मागच्या काही काळात FSSAI च्या आदेशाने सर्व खाद्य उत्पादक कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांच्या चाचण्या घेण्याचे आणि दर सहा महिन्यांनी निकाल अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर काही संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तसेच काहींनी यावर आरोपही केले. याचबरोबर दर सहा महिन्यांनी माहिती अपलोड करण्यासाठी लागणारा खर्च लहान खाद्य निर्मात्यांना परवडणारा नाही. यामुळे हा आदेश मागे घेण्याच निर्णय घेण्यात आला आहे.
अन्न उत्पादनांची चाचणी करणे ही सरकारची जबाबदारी आहे असे सांगून ते म्हणाले की, या आदेशाची जबाबदारी लहान खाद्य निर्मात्यांवर आहे. १२ लाख पेक्षा कमी उलाढाल असलेल्या निर्मात्यांना फक्त FSSAI कडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
तर लहान ऑपरेटर्सची उत्पादन मर्यादा दिवसाला १०० लिटर किंवा किलोग्राम असल्याची माहिती विश्वेश्वर यांनी दिली. दरम्यान प्रत्येक नागरिकांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे यासाठी FSSAI काही आदेश केले आहेत.
अन्न सुरक्षा विभागाचे असे होते पत्र
FSSAI अधिकाऱ्याने आपल्या पत्रात दिलेल्या माहितीनुसार, उत्पादकांकडून अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी परवानाधारक अन्न उत्पादकांकडून किमान सहा महिन्यांत एकदा खाद्यपदार्थांची चाचणी करावी. तसेच ५ ऑगस्ट २०११ पासून अनिवार्य करण्यात आलेल्या सूचनांचेही पालन करावे असे पत्रात नमुद करण्यात आले आहे.
परवानाधारक निर्मात्याने ज्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे त्यापैकी एक म्हणजे अन्न उत्पादनांमधील संबंधित रासायनिक किंवा सूक्ष्मजैविक दूषित घटकांची या नियमांनुसार वारंवार आवश्यकतेनुसार चाचणी करणे. तसेच या चाचण्या किमान सहा महिन्यांतून एकदा NABL-मान्यताप्राप्त FSSAI-अधिसूचित प्रयोगशाळांमध्ये घेतल्या जाणार नसल्याची माहिती आहे.
ते म्हणाले की FSSAI च्या जानेवारी २०२३ च्या आदेशाने परवानाधारकांना नियमांचे पालन करण्याचे आणि अन्न सुरक्षा अनुपालन प्रणाली पोर्टलवर चाचणी अहवाल अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, FSSAI च्या नियमांमुळे निर्मात्यांनी फारसा प्रतिसादाने दिला नाही. यामुळे FSSAI कडून हा आदेश मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.