Sugarcane FRP Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane FRP : साडेतीन महिन्यांनंतरही मिळेना ‘एफआरपी’

Sugarcane Season : साखर कारखान्यांची धुराडी बंद होऊन कारखानापरत्वे दोन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला, तरीही राज्यातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या एफआरपीचे एक हजार २४४ कोटी रुपये अडकले आहेत.

Team Agrowon

Sugarcane Crushing Season : साखर कारखान्यांची धुराद होऊन कारखानापरत्वे दोन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला, तरीही राज्यातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या एफआरपीचे एक हजार २४४ कोटी रुपये अडकले आहेत.

त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे ३६८.५१ कोटी रुपये थकीत आहेत. जिल्ह्यात एफआरपी थकविणाऱ्यांमध्ये सर्वपक्षीय मातब्बर नेतेमंडळींचा समावेश आहे. एफआरपी कायद्याचा धाक कारखान्यांना राहिला नसल्याने शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याची चर्चा आहे.

आजवरचे उच्चांक मोडीत काढत राज्यात यंदा विक्रमी २१० कारखान्यांनी हंगाम घेतला. यावर्षी कारखान्यांची संख्या वाढली असली तरी उसाची वाढ न झाल्याने एकरी टनेजमध्ये मोठी घट झाली. याचा फटका कारखान्यांना बसला.

त्यामुळे उसाअभावी यंदाचा गाळप हंगाम लवकर आटोक्यात आला. यावर्षी जानेवारी महिन्यातच कारखान्यांचा पट्टा पडायला सुरवात झाली. राज्याचा साखर हंगाम यंदा सरासरी १२१ दिवस चालला.

जानेवारीत बंद झालेल्या कारखान्यांनी साडेतीन महिन्यांनंतरही उसाची एफआरपी अद्यापही चुकती केली नाही. एफआरपी थकविणाऱ्या अवघ्या नऊ कारखान्यांवर आरआरसीची कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT