Biogas Agrowon
ताज्या बातम्या

Biogas Plant : यंदा चार हजार सहाशे बायोगॅस संयंत्रे उभारणार

Fertilizer Management : राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमातून राज्यात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत यंदा ४ हजार ६५१ बायोगॅस संयंत्रे उभारण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमातून राज्यात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत यंदा ४ हजार ६५१ बायोगॅस संयंत्रे उभारण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.

त्यात सर्वाधिक संयंत्रे पुणे, सोलापूर, लातूर जिल्ह्यांत असतील. एक हजार संयंत्रांना शौचालये जोडली जातील. शौचालय जोडलेल्या संयंत्राला १६०० रुपये अतिरिक्त दिले जातील. राज्यात यंदा मात्र गतवर्षीच्या तुलनेत कमी उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी ५ हजार २०० संयंत्राचे उद्दिष्ट होते.

केंद्र, तसेच राज्य सरकारने अपारंपरिक स्रोतांचा लाभ घेऊन पर्यावरण संतुलन राखण्याचे धोरण ठरविले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत बायोगॅस संयंत्र उभारले जातात. गेल्या वर्षी ५ हजार २०० संयंत्रे उभारणीसाठी उद्दिष्ट होते.

यंदा संयंत्र उभारणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच्या आकारानुसार बायोगॅससाठी १० हजारांपासून ७० हजारांपर्यंत अनुदान मिळेल. ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसोबतच पशुपालनही करतात. यासोबतच त्यांना शेणखतापासूनही चांगले उत्पन्न मिळते. बायोगॅस बनविण्यासाठीही शेणाचा वापर केला जातो.

बायोगॅस निर्मितीनंतर उरलेली स्लरी शेतात खत म्हणून वापरली जाते. यंदा उभारल्या जाणाऱ्या सयंत्रांत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक १०१२, पुणे जिल्ह्यात ५००, लातूरला ४८० तर नगर जिल्ह्यात ४०१ संयंत्रे उभारली जातील. मार्च २०२४ पर्यंत ही कामे पूर्ण करावी लागतील. सर्वसाधारण प्रवर्गात ४१००, अनुसूचित जातीमध्ये ३२६, तर जमातीमध्ये २९० संयंत्रे उभारली जातील.

नगर जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी क्रांती चौधरी म्हणाल्या, ‘‘नगर जिल्हा परिषदेने या योजनेला गती देण्यासाठी सेस फंडातून तरतुद केली. यंदाही शेतकऱ्यांना अतिरिक्त अनुदान दिले जाईल. प्रतिसंयंत्रानुसार हे अनुदान असेल. एका संयंत्रासाठी ३ हजार ९२१ रुपये गेल्या वर्षी दिले आहेत. घर तेथे बायोगॅस संकल्पना राबविण्याचे प्रयत्न आहेत.’’

शौचालय जोडल्यास १६०० रुपये अधिक

बायोगॅस सयंत्र उभारताना सर्वसाधारण प्रवर्गासाठी १ घनमीटर क्षमतेच्या संयंत्रास ९ हजार ८०० पासून २० ते २५ क्षमतेच्या संयंत्रास ५२ हजार ८०० रुपयांपर्यंत अनुदान मिळेल. याशिवाय अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी १७ हजार ते ७० हजार ४०० पर्यंत अनुदान मिळेल.

बायोगॅस संयंत्रास शौचालय जोडणी केल्यास अतिरिक्त १६०० रुपयांचे अनुदान मिळेल. राज्यात यंदा १ हजार संयंत्रे शौचालयाला जोडली जातील. ६२ ठिकाणी गवंडी व अन्य प्रशिक्षणही घेतले जाईल.

जिल्हानिहाय उद्दिष्ट ः

ठाणे ः ३३, पालघर ः ११०, रायगड ः १०८, रत्नागिरी ः ११५, सिंधुदुर्ग ः १३५, नाशिक ः १५०, धुळे ः ४०, नंदुरबार ः ५०, जळगाव ः ४५, नगर ः ४०१, पुणे ः ५००, सातारा ः २५०, सांगली ः १०७, कोल्हापूर ः१०१२, सोलापूर ः ७५, औरंगाबाद ः १९९, जालना ः ७५, परभणी ः ९३, हिंगोली ः ८०, नांदेड ः ०, बीड ः ५८, उस्मानाबाद ः १५७, लातूर ः ४८०, अमरावती ः २०, बुलडाणा ः ४०, वाशीम ः ११, अकोला ः १४, यवतमाळ ः २४, नागपूर ः ५८, वर्धा ः २४, भंडारा ः ४९, गोंदिया ः २८, चंद्रपूर ः ५०, गडचिरोली ः ६०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT