Sugarcane Crushing Season Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Season : नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने सुरू होणार

Sugar Industry : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार हेक्टरवर ऊस आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार हेक्टरवर ऊस आहे. यंदाही चार साखर कारखाने सुरू होतील. गाळपाची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे. यंदा ऑक्टोबर अखेरीस ऊस गाळप सुरू होईल, असे संकेत आहेत.

ऊस तोडणीसाठी देखील निरभ्र, कोरडे वातावरण आवश्यक असते. यंदा कमी पाऊस दिसत आहे. यामुळे ऑक्टोबरमध्ये खानदेशात साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु गाळपाची तयारी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होईल, असे दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यात दोन सहकारी व दोन खासगी कारखाने सुरू होतील.

त्यात पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथे सातपुडा सहकारी साखर कारखाना, डोकारे (ता. नवापूर) येथे आदिवासी सहकारी साखर कारखाना, समशेरपूर (ता. नंदुरबार) येथे आयान शुगर आणि तळोदा येथे एक खासगी कारखाना सुरू होईल. गेल्या वर्षी समशेरपूर येथील कारखान्याने सुरुवातीपासून गाळपात आघाडी घेतली होती. तर समशेरपूर येथील खासगी कारखाना गाळपात पुढे होता.

या कारखान्याची गाळप क्षमता अधिक असल्याने या कारखान्याने देखील गाळपात वेग घेतला होता. यंदा आयान कारखानादेखील लवकर किंवा नोव्हेंबरमध्येच सुरू होईल, असे दिसत आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी एक प्रतिदिन ६०० ते ७०० टन ऊस गाळपासंबंधी गुऱ्हाळ सुरू झाले होते. यंदादेखील हे गुऱ्हाळ सुरू होईल, असे संकेत आहेत.

जळगाव जिल्ह्यात चहार्डी (ता. चोपडा) येथील कारखाना सुरू आहे. तसेच न्हावी (ता. यावल) येथील मधुकर सहकारी कारखाना सुरू करण्यासाठी देखील शेतकरी, संचालक आग्रही आहेत. मुक्ताईनगर येथील मुक्ताई खासगी कारखानादेखील यंदा सुरू होईल.

भोरस (ता. चाळीसगाव) येथील खासगी कारखाना मागील वेळेस सुरू होता. यंदाही हा कारखानात गाळप वेगात करील, असा अंदाज आहे. परंतु न्हावी (ता. यावल) येथील कारखाना यंदा सुरू होईल की नाही, याबाबत कुठलाही स्पष्टता अद्याप नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Devendra Fadnavis: 'मुश्रीफ, कोरे, बंटी पाटलांनी एकत्र बसून निर्णय केला तर...; 'गोकुळ' वादावर मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले

Paddy Crop Fire : ६ एकर भातपीक आगीत खाक! बोगस बियाण्यांमुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

Crop Insurance : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! विमा कंपनीने नाकारलेले 'रिव्हर्ट' अर्ज पात्र ठरणार; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Sindhudurg ZP : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी सव्वा लाख टन चारा पाठवणार

Chana Sowing : रब्बी हंगामात हरभऱ्याचा डंका! ५५ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण

SCROLL FOR NEXT