Sugarcane Season : ऊस गळीत हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यावर जोर

Sugarcane Harvesting : राज्यात सर्वत्र पावसाची स्थिती फारशी समाधानकारक नाही. उसाची वाढ चांगली झाली नसल्याने हंगाम केवळ शंभर दिवसांपर्यंत चालेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच हंगाम सुरू करावा, अशी मागणी होत आहे. या मागणीला कारखानदारही पाठिंबा देत आहेत.
Sugarcane Season
Sugarcane Season Agrowon
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : उसाची पूर्ण वाढ न झाल्याने ऊस वाळून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी हंगाम लवकर सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. हंगाम कधी सुरू करावा याचा निर्णय मंत्री समिती घेणार असली तरी हंगाम सुरू करण्याच्या निर्णयाबाबत मात्र आतापासूनच गरमागरमी सुरू झाली आहे. यंदाचा हंगाम उस उत्पादकांबरोबरच साखर उद्योगाचीही परीक्षा पहाणारा ठरणार आहे.

Sugarcane Season
Sugarcane Production : यंदाचा गळीत हंगाम लांबणीवर? १ नोव्हेबरला सुरू करण्याच्या हालचाली

राज्यात सर्वत्र पावसाची स्थिती फारशी समाधानकारक नाही. उसाची वाढ चांगली झाली नसल्याने हंगाम केवळ शंभर दिवसांपर्यंत चालेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मुळे यंदाचा हंगाम उशिरा सुरू होईल, अशी शक्यता होती. साखर उद्योगातील तज्ज्ञ यंदाचा हंगाम दिवाळीनंतरच सुरू होईल, अशी शक्यता व्यक्त करत होते. कमी गाळपाच्या अंदाजामुळे कारखाने दिवाळीनंतर सुरू होतील, अशी अटकळ होती.

हंगाम अपुरा होण्याची शक्यता असल्याने उसाची पळवापळवी होईल, नंतर ऊस मिळणार नाही, अशी नवी शक्यता गृहीत धरून आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच हंगाम सुरू करावा, अशी मागणी होत आहे. या मागणीला कारखानदारही पाठिंबा देत आहेत.

Sugarcane Season
Sugarcane Cultivation : उसाची ५९ लाख हेक्टरवर लागवड ; गेल्या वर्षीपेक्षा चार लाख हेक्टरने क्षेत्रात वाढ

मंत्री समिती साधणार मध्य

कारखाने सुरू झाल्यानंतर ते नियमित चालण्यासाठी अनेक कारखाने सुरुवातीला अपरिपक्व उसाची तोडणी करतात. यामुळे कारखाना सुरू झाल्यानंतर सुरुवातीचा एक महिना तरी बहुतांश कारखान्यांची रिकव्हरी कमी लागते. थोडी थंडीत वाढ झाली तर उताराही चांगला पडतो, यामुळे थंडीच्या दिवसांत जास्तीत जास्त गाळपाकडे कारखान्यांचा कल असतो. कमी उतारा पडण्याची शक्यता असल्यानेच काही कारखानदार लवकर हंगाम सुरू करण्याबाबत नाखुश होते. बरोबर याच्या उलट परिस्थिती ऊस उत्पादकांची आहे.

सध्या उसाची वाढ कमी असल्याने जास्त ऊन पडल्यास व पुरेसे पाणी न मिळाल्यास आहे हा ऊस खराब होण्याचा धोका आहे. त्यामुळे ज्या वेळी कारखाने सुरू होतील त्या वेळी पहिल्यांदा ऊस गाळपास जाऊन संभाव्य नुकसान टाळण्याचा उत्पादकांचा प्रयत्न असणार आहे. १५ नोव्हेंबरनंतर हंगाम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर उत्पादकांचा रोख लक्षात घेऊन कारखाना प्रतिनिधींनीही भूमिका लवचिक करताना यंदाचा हंगाम १५ नोव्हेंबरऐवजी एक नोव्हेंबरला सुरू करण्याबाबतचे मत व्यक्त केले आहे. मंत्री समितीला या दोन्ही बाबींचा मध्य साधून हंगाम कधी सुरू करायचा याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.

शेतकरी संघटनांच्या भूमिकेकडे लक्ष

यंदा शेवटच्या टप्प्यात साखरेला एमएसपीपेक्षा पाचशे रुपये जादा भाव मिळत आहे. यामुळे अनेक शेतकरी संघटना साखरेच्या वाढलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना त्याचा लाभ द्यावा, अशी मागणी करत आहेत. यंदा उसाबाबत आणीबाणी असल्याने ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर मिळवून देण्यासाठी संघटना कारखानदारांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे. त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरच यंदाचा हंगाम कधी सुरू होईल हे निश्चित होईल. विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कारखाने शेतकरी संघटनांच्या भूमिकेचा अंदाज घेऊन गाळपाचे नियोजन ठरवत असतात. शेतकरी संघटनांचे आंदोलन हा कारखान्याचा हंगामातील पहिला अडथळा असतो. यामुळे यंदा संघटनांच्या भूमिकेकडे ऊस उत्पादकांची लक्ष आहे.

यंदा राज्यातील उसाची वाढ चांगली नसल्याने गाळप हंगाम १ नेाव्हेंबरपासून सुरू केल्यास राज्याच्या सर्वच विभागास सेाईचे हेाईल, असे वाटते. याबाबत साखर आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत साखर कारखान्यांनी आपले या बाबतची मत व्यक्त केले आहे. या दृष्टिकेानातून विचार करून लवकरच हेाणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत तसा निर्णय हेाणे अपेक्षीत आहे.
पी. जी. मेढे, साखर उद्येाग अभ्यासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com