Gram Cultivation : जळगाव खानदेशात रब्बीची पेरणी रखडत सुरू आहे. पेरणी सुमारे २५ ते २७ टक्के पूर्ण झाली असून, हरभऱ्याची सर्वाधिक सुमारे ५५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. .खानदेशात यंदा सुमारे पावणेतीन लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. यातील कोरडवाहू दादर ज्वारी व कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी सुरूच आहे. ही पेरणी या पंधरवड्यात वेगात सुरू झाली. या महिन्याच्या अखेरिसही कोरडवाहू पिकांची पेरणी सुरू राहणार आहे. कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी तापी, अनेर, गिरणा नदीच्या क्षेत्रात सुरू आहे. ही पेरणी जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागात होत आहे..Drought Crisis : दुष्काळाच्या झळांनी ऊस लागवडीला मोठा ब्रेक; पाणीटंचाईमुळे बळीराजा हवालदिल!.पेरणीत अडथळेयंदा पेरणी सुरवातीपासून रखडत सुरू आहे. कारण सोयाबीन पिकाची मळणी केल्यानंतर त्यात हरभऱ्याची पेरणी करण्याचे नियोजन अनेकांनी केले होते. सोयाबीनची कापणी, मळणी व पुढे शेताची पूर्वमशागत यासाठी वेळ लागला. सणासुदीचे दिवस आहेत. परिणामी पेरणीला विलंब झाला. यामुळे पेरणी रखडत सुरू होती. सध्या गहू पेरणी अपवादानेच सुरू आहे. तसेच हरभऱ्याची पेरणीदेखील कृत्रीम जलसाठाधारक करीत आहेत. अनेक शेतकरी कापूस पीक काढून पेरणीचे नियोजन करीत आहेत. यामुळे पेरणी पुढेही सुरू राहणार आहे..Water For Crops : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अखेर धरणाचे दरवाजे उघडणार; आता उभ्या पिकांना मिळणार हक्काचं पाणी.पूर्वहंगामी कापूस पिकात पेऱणीचे नियोजनपूर्वहंगामी कापूस पीक काढून त्यात पुढे हरभरा, मक्याची पेरणी, लागवड होईल. यामुळे या पेरणीसंबंधी कापूस पीक काढण्याचे काम सुरू आहे. अनेकांचे कापूस पीक आणखी एक वेचणीनंतर काढले जाईल. यामुळे पेरणीला विलंब होणार आहे किंवा पेरणी डिसेंबरमध्येही होईल.यंदा पाऊसमान कमी आहे. यामुळे पेरणी कमी किंवा अपेक्षेपेक्षा कमी होणार आहे. कोरडवाहू पिकांची पेरणी फक्त काळ्या कसदार जमिनीत झाली आहे. मुरमाड, हलक्या जमिनीच्या क्षेत्रात ही पेरणी कमी झाली आहे. पण रब्बीची पेरणी कमी असणार आहे. .सध्या मक्याची लागवड अल्पमक्याची लागवड खानदेशात रब्बी हंगामात अल्प किंवा फक्त सात हजार हेक्टरवर झाल्याची माहिती आहे. ही लागवड जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात अधिक आहे. जळगाव, चोपडा, यावल, जामनेर, पाचोरा भागांत मका लागवड अद्याप अपवादानेच सुरू आहे. पुढे ही लागवड वाढेल, असेही जाणकारांचे म्हणणे आहे. पण ही लागवड फक्त मुबलक कृत्रीम जलसाठ्यांच्या भागातच होईल, अशी स्थिती आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.