Paddy Crop Fire : ६ एकर भातपीक आगीत खाक! बोगस बियाण्यांमुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल
Agriculture News : शहापूर भरघोस पीक येईल, आमच्या कंपनीचे भाताचे बियाणे घेऊन तर बघा, असे सांगून बियाणे घेण्यास भाग पाडल्यानंतर तब्बल ८० टक्के बियाणे निकृष्ट निघाल्याने संतप्त शेतकऱ्याने सहा एकर क्षेत्रावरील भातपिकाला आग लावून पेटवून दिल्याची घटना किन्हवलीजवळील वाचकोले गावात घडली.