Dr. Vinayak Pawar  Agrowon
ताज्या बातम्या

Dr. Vinayak Pawar : माजी कुलगुरू डॉ.‌ विनायक पवार यांचे निधन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (तत्कालीन मराठवाडा कृषी विद्यापीठ) माजी कुलगुरू डॉ.‌ विनायक मोतीराम पवार (वय ७६) यांचे मंगळवारी (ता. ८) रात्री निधन झाले.

Team Agrowon

VNMKV, Parbhani : परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (तत्कालीन मराठवाडा कृषी विद्यापीठ) माजी कुलगुरू डॉ.‌ विनायक मोतीराम पवार (वय ७६) यांचे मंगळवारी (ता. ८) रात्री निधन झाले.
त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. त्यांचे मूळ गाव पिंपळगाव (ता. मालेगाव, जि. नाशिक) आहे.

डॉ. पवार यांनी पुणे कृषी महाविद्यालय व नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था (आयएआरआय) येथे कृषी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १९७४ मध्ये आचार्य (पीएचडी) पदवी संपादन केली.१९७९-८० मध्ये त्यांनी इंग्लंडमधील ऑक्सफर्डमधील विषाणू विज्ञान संस्थेतून पोस्ट डॉक्टरल अभ्यास पूर्ण केला.

डॉ. पवार यांनी त्यांच्या सेवेची सुरुवात राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कृषी कीटकशास्त्र विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून सुरू केली. त्यानंतर ते परभणीच्या मराठावाडा कृषी विद्यापीठातील कीटकनाशके संशोधन प्रकल्पांतर्गत कीटकशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते राहुरी कृषी विद्यापीठात कृषी कीटकशास्त्रज्ञ विभाग प्रमुख, पदव्युत्तर पदवी संस्थेच सहयोगी अधिष्ठाता, विस्तार शिक्षण संचालक, शिक्षण संचालक राहिले. २ ऑगस्ट २००० ते २ ऑगस्ट २००५ या कालावधीत परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते. कुलगुरू पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ते पुणे (सांगवी) येथे स्थायिक झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026: माॅन्सूनची आगेकूच सुरुच; माॅन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबर बेटे व्यापून वाटचाली कायम ठेवली

Farm Loan Repayment: यंदाच्या वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा : मंत्री हसन मुश्रीफ

Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव

Interview with Raju Shetti: ‘कोकणच्या पुढाऱ्यांनी प्रश्‍नांचं गांभीर्य समजून घ्यावं’

Khandesh Irrigation Projects: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण

SCROLL FOR NEXT