Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : किमान तापमान घटण्याचा अंदाज

उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांत किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. आज (ता. १) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon


पुणे : राज्यातील किमान तापमानात घट (Temprature Decreases) होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली घसरू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांत किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. आज (ता. १) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. ३१) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाडच्या गहू संशोधन केंद्रात १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा ११ ते २१ अंशांच्या दरम्यान होता. उन्हाचा चटका कायम असल्याने अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात कमाल तापमान सातत्याने ३० अंशांच्या वरच आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट वाढण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांत आज (ता. १) थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी (ता. ३१) पंजाबमधील अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर आणि ईशान्य भारतातील राज्यात दाट धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे.


शनिवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३२.५ (१३.२), जळगाव ३२ (१२.५), धुळे ३१ (१०.२), कोल्हापूर ३१.६ (१९.२), महाबळेश्‍वर २८.४ (१४.७), नाशिक ३२.२ (१३.२), निफाड ३१.६ (१०.४), सांगली ३१.५ (१७.२), सातारा ३२.३(१५.३), सोलापूर ३४.६ (१८.५), सांताक्रूझ ३१.५(१८), डहाणू २७.३ (२१), रत्नागिरी ३४.२ (१९.६), औरंगाबाद ३१.६ (१३.२), नांदेड ३२.८ (१६.८), उस्मानाबाद - (१७), परभणी ३२.८ (१७.८), अकोला ३५ (१७.१), अमरावती ३२.२ (१४.७), बुलडाणा ३०.५ (१५.४), ब्रह्मपुरी ३३.४ (१७), चंद्रपूर ३१.२ (१७.८), गडचिरोली ३०.६ (१४.३), गोंदिया ३०.६ (१४.३), नागपूर ३२ (१५.१), वर्धा ३२.६(१६), यवतमाळ ३२.५ (१५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीच्या दरात सुधारणा, सोयाबीन दर स्थिर, हरभरा दर दबावातच, आले दराला आधार तर संत्री आवक कमीच

Coconut Farming Success: ओसाड रानात फुलविली नारळ बाग

Vegetable Farming Success: वांगी, मुळा, भाजी; अवघी विठाई तिची !

Maharashtra Cold Wave: राज्यात थंडीचा कडाका काहीसा कमी, तर तापमानात चढ-उतार कायम

Mumbai Weather Today: नवीन वर्ष २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबईत पाऊस, पुढील २४ तासांत कसे राहील हवामान?

SCROLL FOR NEXT