Vegetable Farming Success: वांगी, मुळा, भाजी; अवघी विठाई तिची !
Agricutlure Success Story: बामणोद (ता. यावल, जि. जळगाव) गावातील रूपाली फेगडे यांनी पती विनोद फेगडे यांच्या निधनानंतर धैर्याने सर्व संकटांचा सामना केला. त्यांनी आपल्या कुटुंबाची भरीत वांगी पिकाची शेती फुलविली व वाढविली. भरीत वांगी पिकाची रोपवाटिका चालवत त्या गोपालनही करतात. आपल्या ताज्या, दर्जेदार भरीत वांग्यांची थेट शेतात स्टॉल लावून विक्री करतात.