Mumbai Welcomes New Year 2026 With Rain: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२६ रोजीच्या पहाटे मुंबईतील अनेक भागांत पाऊस पडला. राज्यातील सगळीकडे थंडी असताना मुंबईत (Weather Today) मात्र पावसाने हजेरी लावली. दक्षिण मुंबईच्या दादर, प्रभादेवी आणि लोअर परळ आणि इतर भागातही पावसाच्या सरी बरसल्या. .नवीन वर्षाचे स्वागत सूर्यप्रकाशाच्या पहिल्या किरणांनी होण्याऐवजी पावसाने झाले. आज सकाळी ६ वाजण्याच्या काही वेळ आधी पावसाने सुरूवात केली. काही भागात तो जोरदार पडला. तरी, अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. सकाळी ६.१५ नंतर तो हळूहळू ओसरला..Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तापमानात चढ उतार.आज सकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर येथे अंशतः ढगाळ हवामान होते. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. येथील तापमान १९ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हलका अथवा रिमझिम पावसाच्या सरी पडू शकतात. कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे. .Maharashtra Winter Weather: नववर्षात गारठा कायम राहणार.मुंबईत अचानक कोसळलेल्या या पावसावर सोशल मीडिया यूजर्संनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. "नवीन वर्ष २०२६ च्या पहिल्या दिवशीच पाऊस पडेल, असे कोणाला वाटले होते का?," असे एका यूजर्सने म्हटले आहे. ''मुंबईत नववर्ष २०२६चे स्वागत पहाटेच्या पावसाने झाले.' अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका यूजर्सने दिली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.