Pune News: राज्यातील तापमानात आजही चढ उतार सुरु आहेत. बहुतांशी भागात किमान तापमानात आज वाढ दिसून आली. विदर्भातही तापमान काहीसे वाढले होते. पुढील काही दिवस तापमानातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. .उत्तर भारतातील अनेक भागात आज किमान तापमानात काहीशी वाढ दिसून आली होती. मात्र थंडी कायम आहे. मध्य प्रदेश, बिहार, हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळाली..Maharashtra Winter Weather: नववर्षात गारठा कायम राहणार.आज हरियानातील रोहतक, मध्य प्रदेशातील खजुराहो आणि छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे ४.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. केरळमध्ये सर्वाधिक ३४.३ अंश सेल्सिअस तापमान कोट्टायम येथे नोंदले गेले..Maharashtra Weather Update : विदर्भात थंडीचा कडाका वाढला; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तापमानात चढ उतार.उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी जास्त होत असल्याने राज्यातील थंडीही कमी जास्त होत आहे. विदर्भातील गोंदीया येथे ८.५ अंशाची नोंद झाली होती..तर जळगाव येथे ९.३ अंश, अहिल्यानगर येथे ९.३ अंश आणि निफाड येथेली गहू संशोधन केंद्रात ९.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. राज्यातील इतर ठिकाणी तापमान १० अंशाच्या वरच होते. राज्यातील किमान तापमानातही चढ उतार राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.