Banana CMV
Banana CMV Agrowon
ताज्या बातम्या

CMV Virus : ‘सीएमव्ही’च्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

टीम ॲग्रोवन

रावेर, जि. जळगाव : ज्याप्रमाणे माणसाला कोरोनासह जीवन जगावे लागत आहे. तसेच केळीवरील सीएमव्ही रोगासह (CMV Virus) उत्पादन घ्यावे लागणार आहे मात्र त्याच्या नियंत्रणासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करून या रोगाचा प्रभाव कमी करावा, असे मत राष्ट्रीय स्तरावरील विविध केळी तज्ज्ञांनी (Banana Expert)येथे व्यक्त केले.

फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघ यांच्या वतीने ‘केळीवरील सीएमव्ही रोगाचे व्यवस्थापन’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा येथील मराठा मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये नुकतीचे झाली.

माजी फलोत्पादन आयुक्त डॉ. एच. पी. सिंग, त्रिची येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. सेल्वराजन, केळी तज्ज्ञ के. बी. पाटील, जलतज्ज्ञ सुधीर भोंगळे यांनी संयुक्तपणे हे मत व्यक्त केले. अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील अध्यक्षस्थानी होते.

डॉ. आर. सेल्वराजन म्हणाले, की केळीला यापुढे सीएमव्हीसह अन्य विषाणू रोगांसोबतच जगायचे आहे, या रोगाचे कायमचे उच्चाटन अशक्य आहे, मात्र केळीला या रोगापासून लांब ठेवायचे असेल तर तो रोग संपूर्णपणे समजून घ्यावा लागेल आणि त्यासाठी एकत्रित प्रयत्न करावे लागतील.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी फलोद्यान आयुक्त श्री. सिंग यांनी सांगितले, की १९९०-९१ मध्ये आपल्याकडे केळी उत्पादन हेक्टरी ९६ टन इतके होते. मात्र गेल्या ३० वर्षांत शेतकऱ्यांनी केलेला तंत्रज्ञानाचा वापर आणि मेहनत या जोरावर २०० टन उत्पादन शेतकरी घेत आहेत.

केळी तज्ज्ञ पाटील यांनी सीएमव्हीबाबतच्या शेतकऱ्यांच्या विविध शंकांना उत्तरे दिली. गिलके, दोडके, काकडी, मका, चवळी, कापूस, टरबूज, खरबूज आदी पिकांची लागवड केळीजवळ करू नये तसेच विविध १३०० प्रकारच्या तणांमुळे हा रोग पसरतो त्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कडू पाटील (नेहता) यांनी सीएमव्हीच्या सर्व्हेक्षणाची गरज व्यक्त केली तर मदन पंडित (कुसुंबा) यांनी टिश्‍युकल्चर रोपे देणाऱ्या कंपन्यांनी वेळेतच रोपे देण्याची मागणी केली. श्री. पाटील यांनी जुलै, ऑगस्ट दरम्यान यापुढे आपल्या कंपनीकडून टिश्यू कल्चर रोपांचा पुरवठाच करणार नाही,

शेतकऱ्यांनीही त्याची मागणी नोंदवू नये आणि लागवडही करू नये, असे आवाहन केले. जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे, भागवत पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले. अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाचे सचिव वसंतराव महाजन यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT