Ravikant Tupkar Agrowon
ताज्या बातम्या

Ravikant Tupkar : आयात निर्यात धोरणात बदलासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा ः तुपकर

उपमुख्यमंत्री फडणवीस, सत्तार, मुनगंटीवार यांच्याकडे मागणी

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः राज्यातील सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री अब्दूल सत्तार यांची भेट घेत आयात-निर्यात धोरणात बदलासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली.

सध्या सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल साडेपाच हजारांवर जायला तयार नाही. कापसाचा दरही दीड हजारांनी खाली आला आहे. त्यामुळे या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी तुपकर यांनी नागपुरात उपरोक्त नेत्यांच्या भेटी घेतल्या. गेल्या महिन्यात त्यांनी या विषयावर बुलडाण्यात सोयाबीन-कापूस उत्पादकांचा विराट मोर्चा काढला होता. अरबी समुद्रात जलसमाधी घेण्यासाठी शेतकऱ्यांसह मुंबई गाठली होती. त्यावेळी राज्य सरकारने सह्याद्री अतिथीगृहात त्यांच्यासोबत चर्चा करून राज्य सरकार केंद्र सरकारसोबत चर्चा करून मार्ग काढेल असा शब्द दिला होता. परंतु राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चाच केली नाही.

केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल व कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्याशीही चर्चा झाली होती. पण यासंदर्भात अजून कोणताही ठोस निर्णय आलेला नाही. त्यामुळे तुपकरांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची गुरुवारी (ता. २९) भेट घेऊन केंद्राकडे सोयाबीन-कापसाच्या दरवाढीसाठी आयात निर्यात धोरणात बदल करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करणार असल्याचा असा इशारा दिला.

शेतीला संरक्षणाची मुनगंटीवारांकडे मागणी

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भेट घेत वन्यप्राण्यांपासून शेतीला संरक्षण मिळावे यासाठी शेतीला कुंपण करण्याची योजना तत्काळ आणावी, अशी मागणी तुपकरांनी केली. यासंदर्भात शेतीला कुंपण करण्याची योजना लवकरात-लवकर आणण्याबाबत मुनगंटीवारांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT