हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) मुंबईत (Mumbai) दाखल झाले. सरकारने या आंदोलनाची (Protest) गांभीर्याने दखल घेत चर्चेची तयारी दाखवली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी सह्याद्री अतिथीगृहावर निमंत्रित केले आहे. दुपारी अडीच वाजता रविकांत तुपकर व शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे.
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा गंभीर इशारा त्यांनी दिलेला होता. सांगितले आहे.
त्यानुसार काल 23 नोव्हेंबर रोजी ते मुंबईत पोहचले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले. मुख्यमंत्र्यांचे आमंत्रण रविकांत तुपकर यांनी स्वीकारले. त्यानुसार आज 24 नोव्हेंबर रोजी दुपारी रविकांत तुपकर आणि शिष्टमंडळाची बैठक होणार आहे.
या बैठकीसाठी रविकांत तुपकर पनवेल येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. आंदोलन संपले नाही, या बैठकीत काय निर्णय होतो यावर होतो ते पाहू. मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली तर ठिक अन्यथा आंदोलनाच्या भूमिकेवर कायम असल्याचे रविकांत तुपकर यांनी