Team Agrowon
सिंदखेड प्रजा,ता. मोताळा येथे मियावाकी वृक्ष लागवड अंतर्गत जपानी पद्धतीने १० हजार इतकी वृक्ष-लागवड करण्यात आली.
या गावाने ही वृक्षलागवड तब्बल दोन एकर जमिनीवर केवळ पाच तासात पूर्ण करण्याचा विक्रम रचला.
एका वर्षात या वृक्षलागवडीचे रूपांतर घनदाट जंगलात होणार आहे. पाणी फाऊंडेशन व सेव-ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदखेड या गावाची मियावकी जंगलासाठी निवड करण्यात आली होती.
यासाठी तब्बल 20 लाख रुपये खर्च आला आहे व हा खर्च बंगलोर येथील सेव-ट्रीज या संस्थेने पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने केला आहे. या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात श्रमदान करून येथील श्रमिकांनी रचलेल्या या नव्या विक्रमात मलाही माझे योगदान देता आले, याचा मला विशेष आनंद वाटतो.