Animal Care Agrowon
ताज्या बातम्या

Fodder Shortage : सांगलीत पाणी, चाराटंचाईच्या झळा

Water Crisis Sangli : जून महिना संपला तर जुलै निम्मा झाला तरी जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. पाटबंधारे विभागाकडील ८३ प्रकल्पांमध्ये सध्या १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Team Agrowon

Sangli News : जून महिना संपला तर जुलै निम्मा झाला तरी जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. पाटबंधारे विभागाकडील ८३ प्रकल्पांमध्ये सध्या १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

दुष्काळी पट्ट्यासह इतर भागात चारा आणि पाणी टंचाईच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या नसल्याचे चित्र आहे.

रोहिणी, मृग ही पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. जून संपला, जुलै निम्मा झाला तरी, जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात ५ मध्यम प्रकल्प ५ तर ७८ लघू प्रकल्प असे एकूण ८३ प्रकल्प आहेत.

गत आठवड्यात प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. एका आठवड्यात १८ टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला असून १२ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील १२ तलाव कोरडे पडले आहेत. तर २९ तलावांमध्ये मृतसाठा असून ३० तलावांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा अपुरा असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

चाऱ्याचे संकट

पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्याचबरोबर खरीप हंगाम जवळपास हातातून गेल्यात जमा आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नसल्याचे दिसून येते. आगामी पंधरा दिवसांत पाऊस झाला नाही तर चारा आणि पाण्याचे संकट गंभीर होऊ शकते.

सात गावांत टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यात सात गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये जत तालुक्यातील निगडी, शेड्याळ, सिंदूर आणि पांढरेवाडी तर आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी, पुजारवाडी आणि पिंपरी खुर्द या गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यासाठी नऊ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

तालुकानिहाय प्रकल्पांतील पाणीसाठा तालुका प्रकल्प

संख्या उपयुक्त पाणीसाठा एकूण टक्केवारी

तासगाव ७ ०.८१ ४.३७ ५

खानापूर ८ २.८९ ६.०६ १९

कडेगाव ७ २.२१ ५.८५ १२

शिराळा .५ २.१८ ७.४० ९

आटपाडी १३ ११.८२ १६.७३ ३६

जत २७ ३.३१ १३.६७ ४

कवठे महांकाळ ११ २.८२ ६.१२ १२

मिरज ३ ०.१० ०.६३ ३

वाळवा २ ०.०० ०.०३ ०

एकूण ८३ २६.१३ ६०.९३ १२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT