Animal Fodder Shortage : पावसामुळे नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी चाराटंचाई

Animal Husbandry : सध्या खरिपाच्या तोंडावर कोरड्या चाऱ्याची मोठी टंचाई जाणवत आहे. हिरवा चाराही कमीच आहे. त्यामुळे यंदा चाराटंचाईचा पशुपालकांना सामना करावा लागत आहे.
Animal Fodder Shortage
Animal Fodder ShortageAgrowon

Nashik Animal Fodder News : नाशिक जिल्ह्यात गेल्या एप्रिल व मे महिन्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने चारा पिकांचेही मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी साठवलेला कडबा, मक्याचा व बाजरीचा चारा पावसात भिजल्याने तो सडला.

परिणामी सध्या खरिपाच्या तोंडावर कोरड्या चाऱ्याची मोठी टंचाई जाणवत आहे. हिरवा चाराही कमीच आहे. त्यामुळे यंदा चाराटंचाईचा पशुपालकांना सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यात कसमादे पट्ट्यामध्ये प्रामुख्याने सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यांत अनेक ठिकाणी नुकसान झाले. मागील खरीप हंगामातील साठवून ठेवलेला चारा भिजला आहे. बाजरीचा चारा भिजल्याने तो काळा पडल्याने कुजून खराब झाला आहे.

मक्याचा चारा काळा पडून वास येत असल्याने फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी साठवलेला चारा थोड्या फार प्रमाणात शिल्लक आहे. चारा कसाबसा जूनपर्यंत पुरवला. मात्र तो संपल्याने चाऱ्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

Animal Fodder Shortage
Animal Fodder Production : चारा उत्पादनातून आर्थिक पाठबळ

मुघासामुळे काहीसा दिलास

चाऱ्याच्या स्वयंपूर्णतेसाठी शेतकऱ्यांनी हिरव्या चाऱ्यामध्ये लसूण घास, गिन्नी गवत, नेपिअर गवत लागवड केली आहे. यासोबत कोरड्या चाऱ्यात गव्हाचा भुस्साही खरेदी केला जातो. तसेच कांडी पेंड गाईच्या वयानुसार मात्रेत दिली जाते.

मात्र अनेक शेतकरी चिकातील हिरवा मका खरेदी करून मुरघासनिर्मिती करतात. हा मूरघास हवाबंद करून साठवणुकीसाठी साठवलेला आहे. मात्र पाऊस लांबल्याने यंदा शेवटच्या टप्प्यात फटका बसत आहे. त्यामुळे चारा शोधण्याची धावपळ करावी लागेल, असे कोळगाव (ता. निफाड) येथील पशुपालक रामदास घोटेकर यांनी सांगितले.

या वर्षी उशिरा पाऊस असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे चारा संपलेला आहे. हिरवा चारा पण मिळत नाही. ज्यांच्याकडे आहे की ज्यादा पैसे मागत असल्यामुळे सर्व शेतकरी जरा जनावरांच्या चाऱ्यामुळे अडचणीत आहेत.
शरद देवरे, शेतकरी, कोठरे, ता. मालेगाव
बघता बघता जुन संपत आला तरीही पाऊस कुठेच नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. एकीकडे दुधाचे दर चार ते पाच रुपयांनी कमी झाले. यामुळे खूप मोठा फटका बसला तसेच पावसाला आणखी उशीर झाला तर खरीप पिकांची पेरणी करावी की नाही हाही प्रश्न उभा आहे. या सगळ्या गोष्टींकडे सरकारने गंभीरपणे लक्ष द्यायला पाहीजे.
कैलास जाधव, भरविर, ता. चांदवड
मागील वर्षीपासून साठवणूक केलेला चारा पण आता संपत आला आहे. सद्यःस्थितीत विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांसाठी फक्त पिण्याचे पाणी शिल्लक आहे. ते पण बोअरवेलमार्फत थोडफार उपलब्ध होते. यंदा पाऊस पण लांबला त्यामुळे चाऱ्यासाठी मका, ज्वारी, बाजरी यांची पेरणी पण लांबली. यामुळे जनावरांसाठी चारा कुठून आणायचा, हा विचार शेतकरी करत आहे. शासनाने जनावरांसाठी चारा उपलब्धतेसाठी आतापासूनच प्रयत्न केले पाहिजेत.
जयदीप भदाणे, जिल्हाध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com