Nira Canal Agrowon
ताज्या बातम्या

Nira Canal Irrigation : नीरा डावा कालव्याच्या पहिल्या आवर्तनाला सुरुवात

Agriculture Irrigation : पावसाने ओढ दिल्यानंतर अडचणीत आलेल्या इंदापूर तालुक्यातील खरीप पिकांना नीरा डावा कालव्याच्या पहिल्या आवर्तनाने दिलासा मिळाला आहे.

Team Agrowon

Indapur News : पावसाने ओढ दिल्यानंतर अडचणीत आलेल्या इंदापूर तालुक्यातील खरीप पिकांना नीरा डावा कालव्याच्या पहिल्या आवर्तनाने दिलासा मिळाला आहे. इंदापूर तालुक्यात पावसाने ओढ दिली आहे.

जूनमध्ये एकही दमदार पाउस झाला नाही. तसेच सध्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून उन-पावसाचा खेळ सुरू आहे. जोदार पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

काही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर तसेच रिमझिम पावसावर खरिपातील पिकांच्या पेरण्या केल्या होत्या. मात्र पिकांना पाण्याची गरज जाणवू लागली होती. विहिरीचे पाणी देऊन शेतकरी पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. नीरा खोऱ्यातील धरणामध्ये सुमारे ७० टक्के पाणी झाल्यामुळे नीरा डावा कालव्यातून खरिपाच्या हंगामातील पहिल्या आवर्तनास सुरुवात झाली.

‘टेल टू हेड’ पद्धतीने शेतकऱ्यांना पाणी देण्यास सुरुवात केली असून सध्या ५९ क्रंमाकाच्या वितरिकेवरील शेतकऱ्यांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकांना कालव्यालाचे पाणी मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कालवा फुटीमुळे झाले होते नुकसान

ऐन उन्हाळ्यामध्ये सणसर जवळ तीन वेळा नीरा डावा कालवा फुटल्यामुळे इंदापूर तालुक्यातील पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. अनेकांची शेतामधील पिके वाहून गेली होती. तर अनेकांना कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे पिके जळून गेली होती. सध्या कालव्याला पाणी आले असून लवकर पाणी मिळावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

शेटफळ तलावात ६ टक्के पाणी

इंदापूर तालुक्यातील शेटफळच्या तलावात सध्या ६ टक्के पाणीसाठा आहे. खरिपाच्या हंगामातील पहिले आवर्तन संपल्यानंतर किंवा तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्यास शेटफळच्या तलावामध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Compensation GR : तमिळनाडू सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

Chemical Fertilizers Uses: जमिनीच्या गुणधर्मानुसार रासायनिक खतांचा वापर

Farmers Protest: बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शेतकरी धडकणार

India Bangladesh Trade: बांगलादेश भारतातून ५० हजार टन तांदूळ खरेदी करणार

Sushasan Week: सेवा संवेदनशील आणि गतिशीलतेने द्याव्यात

SCROLL FOR NEXT