Mosambi Orchard Agrowon
ताज्या बातम्या

Mosambi Orchard : मोसंबीतून आर्थिक स्थैर्य शक्य

जिल्ह्यातील मोसंबी हे एक महत्त्वाचे फळ पीक आहे. मोसंबी पिकात शास्त्राचा वापर करून उत्पादन घेतल्यास आर्थिक उत्पन्न वाढून आर्थिक स्थैर्य मिळू शकते.

Team Agrowon

जालना : जिल्ह्यातील मोसंबी (Mosambi) हे एक महत्त्वाचे फळ पीक आहे. मोसंबी पिकात (Mosambi Crop) शास्त्राचा वापर करून उत्पादन घेतल्यास आर्थिक उत्पन्न वाढून आर्थिक स्थैर्य मिळू शकते, असे प्रतिपादन एस. व्ही. सोनुने यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे मोसंबीतील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन (Integrated Pest Disease Management) या विषयावर एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. उद्‍घाटन कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने, प्रगतिशील शेतकरी उद्धवराव खेडेकर, कृषी अभियंता प्रा. पी. व्ही. वासरे, कीटकशास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी उपस्थित होते.

श्री सोनोने म्हणाले, की मोसंबीमध्ये बहार प्रक्रियेला विशेष असे महत्त्व आहे. मोसंबीतील कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी वर्षातून एकाच बहराचे नियोजन करावे. बोर्डो पेस्टसारखे चांगले बुरशीनाशक शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने तयार करून वर्षातून कमीत कमी दोन वेळेस मोसंबीच्या खोडाला लावले पाहिजे.

श्री. खेडेकर म्हणाले, की पाण्याचा काटेकोर व कार्यक्षम वापर करणे ही काळाची गरज, असल्याचे ते म्हणाले. मोसंबीमध्ये वातावरणातील तापमानानुसार किती पाणी द्यावे व पाण्याचे नियोजन संदर्भात पी. व्हो. वासरे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा दरम्यान शेतकऱ्यांना बोर्डे पेस्ट तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इंजि. वासरे यांनी मानले. प्रशिक्षणासाठी जालना जिल्ह्यातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Crop Registration: अमरावतीत ७९ टक्के शेतकऱ्यांचा ऑनलाइन पीक पेऱ्याला खो

Jal Jeevan Mission: जलजीवन योजनेचे काम रखडल्याने टंचाईच्या झळा

Pesticide Company Inspection: ‘ड’ वर्गातील कीडनाशक कंपन्या रडारवर

LPG Cylinder Crisis: एलपीजी सिलिंडरमधून मिळणार केवळ १० किलो गॅस

Milk Adulteration MCOCA Action: दूध भेसळखोरांवर ‘मकोका’चा बडगा

SCROLL FOR NEXT