Agriculture Inputs Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Inputs : अनधिकृत निविष्ठा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

Latest Agriculture News : बोगस बियाणे तयार करणाऱ्यांची गोदामे शोधून पुढील दहा दिवसांत अनधिकृत बियाणे जप्त करण्याची कारवाई करावी.

Team Agrowon

Yavatmal News : बोगस बियाणे तयार करणाऱ्यांची गोदामे शोधून पुढील दहा दिवसांत अनधिकृत बियाणे जप्त करण्याची कारवाई करावी. शेतकऱ्यांना यापुढे बोगस बियाणे मिळणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी (ता. ३०) दिले आहेत.

खरीप हंगाम २०२३ मध्ये कृषी निविष्ठांच्या नियोजनासाठी जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये जिल्ह्याला आवश्यक बियाणे व खते याबाबत महिनानिहाय नियोजनाबाबत चर्चा झाली.

शेतकऱ्यांना पुरवठा होणाऱ्या कृषी निवीष्ठांच्या गुणवत्तेसाठी जिल्ह्यामध्ये स्थापन केलेल्या १७ भरारी पथकांमार्फत प्रत्येक तालुक्यात तपासणी करावी व अनधिकृत बियाणे व खते विक्री व साठा करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

अवैधरीत्या अनधिकृत कापूस बियाण्यांची (HTBT) वाहतूक, वितरण, विक्री व साठवणूक होऊ नये याकरिता भरारी पथकामार्फत तपासण्या करून कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

या वर्षी पावसाळा लांबल्यामुळे जमिनीत पुरेशी ओल म्हणजे १०० मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. तसेच दुबार पेरणी करावी लागल्यास त्यासाठी बियाण्यांचे व खताचे नियोजन कृषी विभागाने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात.

खरीप हंगाम २०२३ मध्ये शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियाणे खरेदी करताना जिल्ह्यातील नोंदणीधारक कृषी विक्रेते यांच्याकडून पक्के बिल घेऊनच खरेदी करावी. एका विशिष्ट व्हरायटीच्या बियाण्याची मागणी करू नये. तसेच राखून ठेवलेले घरचेच सोयाबीन बियाणे उगवण शक्तीची तपासणी करूनच वापरण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले.

खरेदी केलेल्या बियाण्यांचे उगवणीबाबत काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांना पेरणीपासून ७ दिवसांचे आत त्याबाबतची तक्रार लिखित स्वरूपात संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय किवा कृषी विभाग, पंचायत समिती येथे दाखल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.

तसेच तक्रार प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार ७ दिवसांच्या आत त्यावर कृषी विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश सुद्धा जिल्हाधिकारी यांनी दिलेत. बियाणे व खते याबाबत शेतकऱ्यांना अडचण आल्यास ९४०३ २२ ९९९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असेही त्यांनी या वेळी आवाहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT