Paddy Bonus Agrowon
ताज्या बातम्या

Seed Shortage : दुबार शेतीसाठी बियाण्यांची प्रतीक्षा

कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर खरीप पीक तथा भातशेती केली जाते.

Team Agrowon

कर्जत : तालुक्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यात राजनाला कालव्याला दुबार भातशेतीसाठी (Paddy Re-cultivation) पाणी सोडण्यात येते. यंदाही पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, भातशेती लावण्यासाठी जे चांगले बियाणे (Seed) आवश्यक असते, तेच कृषी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र यांच्याकडे उपलब्ध नसल्याने आता भातशेती (Paddy Farming) करायची तरी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर खरीप पीक तथा भातशेती केली जाते. तेव्हा कृषी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, भात खरेदी-विक्री संघाकडून शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध करून दिले जाते. जुलै ते नोव्हेंबर या महिन्यात भातशेती तयार होते. त्यानंतर पुन्हा याच शेतीत राजनाला कालव्याच्या पाण्यावर दुबार भातशेती करण्यात येते.

सद्यस्थितीत अनेकांनी भातशेतीची तयारी केली आहे. मात्र, त्यासाठी लागणारे बियाणे आता उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कर्जत ३, ५, ७, १८४, तसेच सह्याद्री ३ ही बियाणे चांगल्या दर्जाची असून कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारी आहेत. मात्र, आता ती कोठेही उपलब्ध नाहीत.

याबाबत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांच्याकडे विचारणा केली असता, बियाणे शिल्लक नाही. शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, भात खरेदी-विक्री संघ यांच्याशी संपर्क करावा, असे शेतकऱ्यांना सांगितले. शेतकऱ्यांनी त्यानुसार सूचवलेल्या ठिकाणी बियाण्यांबाबत विचारणा केली. तेथूनही बियाणे नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे शेतकरी हताश झाले आहेत.

भातशेतीच्या नुकसानीची शक्यता

आता त्वरित बियाणे मिळाल्यास भातलागवड केली, तर एप्रिलपर्यंत भात तयार होईल, अशी माहिती शेतकरी तथा राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण यांनी दिली. उशिरा बियाणे उपलब्ध झाल्यास भातशेती तयार व्हायला जून महिना उजाडल्यास येणाऱ्या पावसामुळे तयार नुकसान होऊ शकते. त्यामुळे आताच बियाणे मिळणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT