Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : पेरणीपूर्व पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Monsoon Rain : वळीव पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील शेती कामांची गती मंदावली आहे. वळवाचा पाऊस झाल्याशिवाय मशागतीच्या कामाना वेग येत नाही.

Team Agrowon

Kharif Season 2023 : वळीव पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील शेती कामांची गती मंदावली आहे. वळवाचा पाऊस झाल्याशिवाय मशागतीच्या कामाना वेग येत नाही.

कोवाड परिसरात बहुतांश भाताची पेरणी धूळवाफ पद्धतीने केली जाते. त्यामुळे पेरणीपूर्व वळीव पावसाची गरज असते. या वर्षी एकदाही असा मोठा वळीव पाऊस झाला नसल्याने शेती कामांची गती थंडावली. शेतकरी पेरणीपूर्व पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

पावसाअभावी या वर्षी खरिपातील भाताचा पेरा लांबणीवर पडणार असे दिसते. चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात माणगावपासून ते राजगोळीपर्यंत जास्तीत-जास्त भाताची धूळवाफ पेरणी केली जाते. कुरीने ही पेरणी केली जात असल्याने शेतीची मशागत चांगली व्हावी लागते.

पावसाच्या अंदाजावर खरिपातील पेरणी अवलंबून असल्याने शेतकरी पावासाची प्रतीक्षा करत आहेत. दरवर्षी मे महिन्यात अधूनमधून वळीव पाऊस पडतो. त्यामुळे मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भाताची धूळवाफ पेरणी केली जाते. या वर्षी वळीवाने दडी मारल्याने शेती शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली. पावासाची वाट पाहून शेतकऱ्यांनी शिवारं पेरणीसाठी तयार करून ठेवली आहेत.

२० टक्के शेतकऱ्यांनी धूळवाफ पद्धतीने भाताची पेरणी केली आहे. अजून ७० टक्के शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. १० टक्के शेतकरी फक्त रोप लागण करतात. त्यामुळे धूळवाफ पेरणीपूर्व पावसाची गरज असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जूनपासून मॉन्सूनची सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून पेरणीला सुरुवात केली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी पाऊस लांबणार, असे दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी.
-वाय. पी. पोळ, तालुका कृषी अधिकारी, चंदगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT