Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Crop Competition : खरीप हंगाम पीकस्पर्धेत शेतकऱ्यांनी भाग घ्यावा

Kharif Season 2023 : खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, मूग व उडीद या ११ पिकांसाठी खरीप हंगाम पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News : खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, मूग व उडीद या ११ पिकांसाठी खरीप हंगाम पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेता यावे आणि त्यांच्यात स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्यात पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

तालुक्यामध्ये लागवड क्षेत्र १ हजार हेक्टर हून अधिक आहे, अशा सर्व पिकांसाठी ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक, तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी ३०० रुपये प्रति शेतकरी प्रति पीक प्रवेश शुल्क राहील.

एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पीक कापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार त्याची तालुका पातळीवर निवड केली जाईल. यापूर्वी तालुका पातळीवर कधीही प्रथम तीन क्रमांक आलेले शेतकरी जिल्हा पातळीवरील पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यास पात्र असतील. जिल्हा पातळीवर प्रथम तीन आलेले शेतकरी राज्य पातळीवर सहभागी होण्यास पात्र असतील. तालुका व जिल्हा पातळीवरील पीक स्पर्धा स्वतंत्र होईल.

मूग, उडदाची अंतिम मुदत ३१ जुलै

खरीप हंगामातील मूग व उडीद पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै व भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Linking Ban: खतांच्या 'लिंकिंग'ला तत्काळ प्रभावानं मनाई, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Honey Villages: शेलमोहा आणि काकडदाभा होणार मधाची गावे

Monsoon in Kharif : माॅन्सून यंदा लवकर येणार पण पाऊस पडणार का?

Goat Farming Training: कृषी विज्ञान केंद्राकडून तरुणांसाठी ‘व्यावसायिक शेळीपालन प्रशिक्षण’

Cotton Seed Packets Demand: कपाशी बियाण्याच्या ११.४३ लाख पाकिटांची मागणी

SCROLL FOR NEXT