Agriculture Department : नऊ लाख शेतकऱ्यांसाठी केवळ ३२३ कृषी सहायक

Agriculture Assistant : राज्य शासनाच्या कृषी विभागात आता कृषी सहायकांना शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. सातारा जिल्ह्यातील १७०० गावांतील नऊ लाख ९,५६९ शेतकऱ्यांसाठी फक्त ३२३ कृषी सहायकच उपलब्ध आहेत.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Karad News : राज्य शासनाच्या कृषी विभागात आता कृषी सहायकांना शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. सातारा जिल्ह्यातील १७०० गावांतील नऊ लाख ९,५६९ शेतकऱ्यांसाठी फक्त ३२३ कृषी सहायकच उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील तब्बल १३२ कृषी सहायकांची पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांसाठीच्या शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविताना कसरतच करावी लागत आहे.

खरिपाचा हंगाम सुरू असतानाही कृषी सहायकांना शासनाच्या आदेशानुसार ई-केवायसीच्या कामात गुंतवण्यात आल्याने इतर कृषी योजनांची कामे धीम्या गतीने सुरू आहेत. शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांमुळे कृषी विभागात कामाचा व्याप प्रचंड वाढला असून, तुलनेत मनुष्यबळाची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे.

Agriculture Department
Agriculture Department : अनधिकृत निविष्ठांकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष

एका कृषी सहायकाकडे तब्बल पाच ते सात गावांचा भार असल्याने एकाही योजनेकडे त्यांना नीटपणे लक्ष देता येत नाही अशी स्थिती आहे. एका गावाला भेट देऊनही आठवड्यात गावे संपत नसल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकरी सन्मान योजनेसाठीच्या ई-केवायसीच्या कामाला कृषी विभागाने प्राधान्य दिले आहे.

गावोगावी शेतकऱ्यांची शिबिरे घेऊन आधार कार्ड व तत्सम माहिती गोळा केली जात आहे. सुट्टीच्या दिवशीही कामे सुरू आहेत. तरीही ते कामे अपूर्ण आहे. यावरून वरिष्ठांचे ऐकून घ्यावे लागत आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना भात बियाण्यांविषयी मार्गदर्शन हवे असल्यास तेथे कृषी सहायकांना लवकर जाता येत नाही, अशीच परिस्थिती सातारा जिल्ह्यात आहे.

Agriculture Department
Agriculture Department : व्हॉटस्ॲपवर नोंदवा निविष्ठाविषयक तक्रारी

पाटण तालुक्यात सर्वाधिक कमी कृषी सहायकांची संख्या आहे, त्या खालोखाल खटाव, कोरेगाव, वाई, महाबळेश्‍वर तालुक्यांतही कृषी सहायकांची संख्या कमी आहे. शासनाच्या कृषी योजना राबवण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना त्यापासून वंचितच राहावे लागणार आहे.

...अशी आहे

तालुकानिहाय स्थिती

तालुक्याचे नाव मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे

सातारा ४९ ४१ ८

कोरेगाव ४९ ३२ १७

खटाव ४९ २६ २३

कऱ्हाड ४९ २८ २१

पाटण ४९ १९ ३०

महाबळेश्‍वर २५ १४ ११

खंडाळा २५ २१ ४

जावळी २५ २४ १

वाई ३७ २५ १२

माण ४९ ४४ ५

फलटण ४९ ४९ ०

एकूण ४५५ ३२३ १३२

सातारा जिल्ह्यात कृषी सहायकांची पदे रिक्त आहेत, त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांनाच शेतकरी सन्मान योजनेसह शासनाच्या अन्य योजनांची लाभ द्यावा लागत आहे. रिक्त पदांची संख्या वरिष्ठ कार्यालयाला कळवली आहे. पदे रिक्त असली तरीही सध्या प्राधान्याने शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गावोगावी कृषी सहायक जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवत आहेत. कृषी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत, मात्र त्या योजनेचे काम थांबवलेले नाही. सुट्टीच्या दिवशीही शेतकऱ्यांपर्यंत जाऊन ते त्यांची कामे मार्गी लावत आहेत.
- भाग्यश्री पवार-फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com