Kharif Season Agrowon
ताज्या बातम्या

Bull For Sowing : सर्जाराजाच्या जोडीलाच पसंती

Kharif Sowing : पावसाचा जोर वाढल्‍याने बळिराजा शेतीच्या कामात गुंतला आहे. ट्रॅक्टर व इतर यांत्रिक साधनांच्या तुलनेत जिल्ह्यातील शेतकरी आजही नांगरणीच्या कामासाठी बैलांना पसंती देत आहेत.

Team Agrowon

Pali News : पावसाचा जोर वाढल्‍याने बळिराजा शेतीच्या कामात गुंतला आहे. ट्रॅक्टर व इतर यांत्रिक साधनांच्या तुलनेत जिल्ह्यातील शेतकरी आजही नांगरणीच्या कामासाठी बैलांना पसंती देत आहेत. जमिनीत खोलवर जाणारा नांगराचा फाळ, छोट्या व तुकड्यांच्या शेतासाठी उपयुक्त असल्‍याने पारंपरिक नांगरणीला महत्त्व आहे.

पेरणी केलेली भातरोपे तरारली असून लावणीची कामे जोमाने सुरू आहेत. जिल्ह्यात भातशेती तुकड्यामध्ये विभागली आहे. डोंगर उताराला लागून तसेच दुर्गम भागात असल्‍याने, तसेच शेताभोवती बांध असल्‍याने ट्रॅक्टर नेणे गैरसोयीचे होते.

मात्र नांगर व बैल कुठेही सहज पोहोचू शकतात. नांगराचा फाळ जमिनीत खोलवर जाऊन जमीन भुसभुशीत करतो. त्यामुळे पेरणी करणे सोपे जाते.

नांगऱ्यास मागणी

नांगरणी करणाऱ्या शेतकऱ्यास किंवा मजुरांना नांगऱ्या म्हणतात. काही शेतकरी स्वतः आपल्या शेतात नांगरणी करतात. तर काहीजण नांगऱ्याला बोलवतात. बैलजोडी, नांगरासह नांगऱ्याची मजुरी ७०० ते १००० रुपये प्रती दिवस आहे.

जर पैसे नाही घेतले तर त्या बदल्यात नांगर्‌याकडे शेतीवर काम करण्यासाठी तीन-चार माणसे द्यावी लागतात, असा हा व्यवहार असतो. नांगऱ्याला मजुरीबरोबरच एक वेळची न्याहरी, जेवण व दोन वेळेचा चहापाणी द्यावा लागतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT