Kharif Sowing : पावसाच्या दडीचा पेरणीसह पिकांच्या उगवणीवर परिणाम

Kharif Season 2023 : पावसाने दडी मारल्यामुळे अनेक ठिकाणी पिकाच्या पेरणीवर व पेरणी केलेल्या पिकांच्या उगवणीवर परिणाम झाला आहे.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon

Pune News : पावसाने दडी मारल्यामुळे अनेक ठिकाणी पिकाच्या पेरणीवर व पेरणी केलेल्या पिकांच्या उगवणीवर परिणाम झाला आहे. राज्याचे फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांनी शिक्रापूरसह शिरूर तालुक्यातील काही गावांमध्ये शुक्रवारी (ता. १४) त्याची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा केली.

Kharif Sowing
Kharif Sowing : विदर्भात पेरण्यांनी पकडली गती

शिक्रापूर येथे किरण खुळे यांच्या शेतावर पावसामुळे सोयाबीन व ऊस उगवण क्षमतेवर झालेल्या परिणामाची पाहणी मोते यांनी केली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट, शिरूर तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, मंडळ कृषी अधिकारी सुनील मोरे, सुनील राजे, कृषी पर्यवेक्षक संतोष जगताप आदी उपस्थित होते.

Kharif Sowing
Kharif Sowing : मुगाची सोळा टक्के, उडदाची १४ टक्के पेरणी

पावसात खंड आल्यामुळे काही ठिकाणी पिकांची उगवण झालेली नाही. उगवण झालेल्या ठिकाणी पाण्याअभावी कोंब सुकत आहेत. त्यामुळे उपाययोजनांसाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, कृषी विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी आणि शेतकऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना मोते यांनी दिल्या.

मुखईत बाजरी, तसेच प्रगतिशील शेतकरी अभिजित धुमाळ यांच्या शेतातील सफरचंद बागेसह ऊस पीक रोपवाटिकेची देखील मोते यांनी पाहणी केली. एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत अनुदानित ट्रॅक्टरची पाहणी करून शेतकऱ्यांनी योजनांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मोते यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com