Ratnagiri Farmers March  Agrowon
ताज्या बातम्या

Ratnagiri Farmers March : भर पावसात बागायतदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Farmers March to Demand Justice : आंब्याच्या तसेच कोकणातील विविध पिकांच्या संशोधनासाठी रत्नागिरी येथे सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारण्यात यावी, यासह अन्य मागण्या या निमित्ताने करण्यात आल्या.

Team Agrowon

Ratnagiri News : ‘शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो’, ‘आवाज कुणाचा, शेतकऱ्यांचा’ अशा घोषणांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. कर्जबाजारी झालेल्या बागायतदारांना संपूर्ण कर्जमाफी, सात-बारा कोरा करा यांसह अनेक मागण्यांसाठी आंबा, काजू बागायतदारांनी मंगळवारी (ता. २५) भर पावसात मोर्चा काढला. तसेच दिवसभर धरणे आंदोलनही केले.

आंबा बागायतदार बाबा साळवी, कुमार शेट्ये, मंगेश साळवी, नंदू मोहिते, सचिन आचरेकर यांच्यासह शासनाने आंबा, काजू, फळ बागायतदार, शेतकरी, छोटे व्यावसायिक यांची संपूर्ण कर्जमुक्ती बिनाअट सरसकट करावी. कोकणातील प्रदूषण करणारे कारखाने बंद झालेच पाहिजेत, कर्जदार शेतकऱ्यांचे सात-बारा उतारे कर्जमुक्त झालेच पाहिजेत, शेतकऱ्यांच्या फळबागायतीचे विम्याचे निकष बदलेच पाहिजेत,

२०१४-१५ या वर्षांपासून २०२३-२४ पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे व्याज व पुढील वर्षांसाठी ४ टक्के व्याजाने शासनाने कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, शेतकऱ्यांच्या कृषिपंप व घरगुती मीटरचे दर कमी करण्यात यावेत,

शेतकऱ्यांना खते व कीटकनाशके खरेदी केलेल्या बिलावर शासनाने अनुदान द्यावे, आंब्याच्या तसेच कोकणातील विविध पिकांच्या संशोधनासाठी रत्नागिरी येथे सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारण्यात यावी, यासह अन्य मागण्या या निमित्ताने करण्यात आल्या.

या प्रसंगी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उदय बने म्हणाले, की कोकणात विद्यापीठ आहे, पण त्याचा उपयोग बागायतदारांना होत नाही. शासनाचे प्रतिनिधी, शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांचा मंच स्थापन झाला पाहिजे. त्यांच्या बैठका आंबा बागेत व्हायला पाहिजेत. सर्वांना जागे करण्यासाठी मंत्री परिषद कोकणात झाली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांना नुसतेच निवेदन देऊन काहीच उपयोग नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

Water Storage: देशातील मोठी ४० टक्के धरणे निम्मी रिकामी, महाराष्ट्रात किती पाणीसाठा?

Unseasonal Rain Damage: धाराशिव जिल्ह्यात दीड हजार हेक्टरला पूर्वमोसमीचा फटका

Farmers Agitation: अन्नत्यागातून शेतकऱ्यांप्रति सहवेदना

Paddy Disease: धान पिकावर करपा रोग

SCROLL FOR NEXT