Farmers Protest : वीज कंपनीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

Electricity : शिंदखेडा तहसील कार्यालयात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, शेतकरी रावसाहेब ईशी यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण केले होते.
Electricity
Electricity Agrowon
Published on
Updated on

Dhule News : कळगाव, कुंभारे, लोहगाव, वसमाणे येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा देण्याचा शब्द देऊन त्यांना फक्त दोन ते तीन तास वीजपुरवठा केला जात असल्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आक्रोश करीत ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

शिंदखेडा तहसील कार्यालयात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, शेतकरी रावसाहेब ईशी यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण केले होते. त्या वेळी तहसीलदारांनी अधिकाऱ्यांची बैठक लावून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. त्या वेळी वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आठ तास वीजपुरवठा नियमित केला जाईल, असा शब्द दिला होता.

Electricity
Khandesh Electricity Supply : खानदेशात विजेअभावी शिवारातील पिकांची होरपळ

गेल्या आठ दिवसांपासून कळगाव, कुंभारे, लोहगाव व वसमाणे येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी चोवीस तासांत फक्त दोन ते तीन तास वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतीत पेरणी केलेले बियाणे नुकसान होऊन दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर आहे.

शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कळगाव, कुंभारे, लोहगाव व वसमाणे गावातील शेतकरी दोंडाईचा येथे वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता आर. बी. जोशी यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यासाठी आले असता वीज वितरण कंपनी कार्यालयात फक्त सुहास चौधरी उपस्थित होते. संतप्त शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो झाला नाही.

Electricity
Electricity Supply : निफाड तालुक्याच्या पूर्व भागात चोरट्यांचा महावितरणला झटका

बाह्मणे व लंगाणे येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. त्यांनीही शेतकऱ्यांना समर्पक उत्तरे दिली नसल्याचे संतप्त शेतकऱ्यांसह नानाभाऊ सोनवणे, उपकार्यकारी अभियंता बोरसे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. आर. बी. जोशी यांच्याशी चर्चा करून आठ तास वीजपुरवठा केला जाईल, असे सांगितले. एका शेतकऱ्याने कार्यालयात पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यास नानाभाऊ सोनवणे यांनी वेळीच अडविले.

शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. नानाभाऊ सोनवणे, शिवमावळा प्रतिष्ठान प्रमुख विजयभाऊ पाटील, लोहगाव सरपंच चिंतामण माळी, महेंद्र पाटील, शेतकरी ज्ञानेश्वर पाटील, राहुल पाटील, भावराव महाजन, खंडेराव वासुदेव, सुनील पाटील, हरपाल गिरासे, जितेंद्र पाटील, चंद्रशेखर पाटील, ज्ञानेश्वर भास्कर पाटील, विजय गोसावी, मयूर कदमबांडे, पंकज गिरासे, जगदीश गोसावी, भानुदास माळी आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com