Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Bajari Sowing : राहूबेट परिसरातील शेतकऱ्यांची बाजरी पेरणीला पसंती

Kharif Sowing : दौंडच्या पश्चिम पट्ट्यासह राहूबेट परिसरात पावसाच्या हलक्या सरींमुळे शेतकरी राजा सुखावला आहे. त्यामुळे बाजरी पेरणीला काही ठिकाणी सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Pune News : दौंडच्या पश्चिम पट्ट्यासह राहूबेट परिसरात पावसाच्या हलक्या सरींमुळे शेतकरी राजा सुखावला आहे. त्यामुळे बाजरी पेरणीला काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. पारंपरिक बैलाच्या साह्याने बाजरी पेरणीला शेतकऱ्यांची मोठी पसंती मिळत आहे.

दौंडच्या पश्चिम पट्ट्यात साधारणता ३० टक्के पर्यंत शेतकरी बाजरी पिकाला पसंती देतात. वातावरणातील गारवा, मुळा मुठा तसेच भीमा नदीकाठच्या गावातील तसेच बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांनी बाजरी पेरणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. बाजरीचे बियाणे कृषी सेवा केंद्रात घेण्याकडे शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे, असे संतोष भरणे यांनी सांगितले.

ट्रॅक्टर पेक्षा बैलाच्या साह्याने बाजरीची पेरणी केल्यास उगवण क्षमता चांगली राहते. बाजरी पातळ होत नाही तसेच बाजरीच्या उत्पादनात देखील अधिक भर पडते. बैलाच्या साह्याने पेरणी केल्यामुळे पेरणीसाठी कमी बियाणे लागतात.

- अंकुशराव भरणे, प्रगतशील शेतकरी राहू (ता.दौंड)

मागील ३० ते ३५ वर्षांपासून बाजरी, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल, कारडई पेरणीची कामे करतो. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बैलाच्या साह्यानेच पेरणी करावी. जेणेकरून उगवण क्षमता चांगली राहते. उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात मिळण्यास मदत होते.

- उत्तमराव मेमाणे, बियाणांची पेरणी करणारे शेतकरी.

कालबाह्य बियाण्यांची तपासणी करा

शेतकऱ्यांनी खात्रीशीर दर्जेदार बियाण्यांची पेरणी करा. बियाणे घेताना नामांकित कंपनी तसेच बियाण्यांची उत्पादन तारीख, बियाण्यांची कालबाह्य मुदत (एक्सपायर डेट) तपासणी करा. अधिकृत कृषी सेवा केंद्रामध्येच बियाणे खरेदी करावे, असे दौंड तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT