Team Agrowon
सध्या खानेदेशातील बाजारात बाजरीची आवक सुरू झाली असून २५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर स्थिर आहेत.
भरडधान्यांच्या जनजागृतीमुळे बाजरीला बाजारात चांगला उठाव असल्याचे चित्र आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे 'आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष' म्हणून घोषित केले आहे. भरडधान्यांच्या जनजागृतीमुळे बाजरीची मागणी वाढली आहे.
गेल्या आठवड्यातच बाजरीच्या कापणी, मळणीला सुरूवात झाली आहे. डिसेंबर अखेरीस लागवड केलेल्या बाजरीची मळणी पूर्ण झाली आहे.
खानदेशात जळगावमधील अमळनेर, चोपडा, चाळीसगाव तसेच धुळ्यातील धुळे, साक्री, शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा) आणि नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा या बाजार समित्या बाजरीसाठी प्रसिद्ध आहेत.
चोपडा, अमळनेर व चाळीसगाव येथील बाजारात मिळून सध्या प्रतिदिन सरासरी ९०० क्विंटल बाजरीची आवक होत आहे.
खानदेशातील बाजरीचा पुरवठा उत्तर भारतातही होतो.