Farmer Training Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Training : देवरी येथे शेतकरी गट संघटन, कौशल्य विकास प्रशिक्षण

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करून आपला शेतमाल एकत्रितरीत्या विक्री केल्यास दलालांचे कमिशन कमी होऊन नफ्याचे प्रमाण वाढेल.

Team Agrowon

Akola News : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (Agriculture Technology) यंत्रणेच्या पुढाकाराने या वर्षात स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक गटांच्या क्षमता बांधणीचे प्रशिक्षण अकोट तालुक्यातील देवरी फाटा येथे घेण्यात आले.

यावेळी मार्गदर्शक म्हणून आत्माचे तालुका समन्वयक नीलेशकुमार नेमाडे, उमेदचे तालुका अभियान समन्वयक नितीन वाघ, कृषी पर्यवेक्षक अनंत देशमुख, कृषी सहाय्यक प्रकाश साबळे, नीलेश फोकमारे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करून आपला शेतमाल एकत्रितरीत्या विक्री केल्यास दलालांचे कमिशन कमी होऊन नफ्याचे प्रमाण वाढेल.

आत्माअंतर्गत शेतकरी गट नोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रे व नोंदणी प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत तसेच कृषी विभागाच्या गटाकरिता चालू असलेल्या विविध योजनांची माहिती श्री. नेमाडे यांनी दिली.

गट स्थापन झाल्यानंतर गट सदस्यांच्या भूमिका, त्यांच्या जबाबदाऱ्या, तसेच गटाच्या अभिलेखांची नोंद कशी घ्यावी याबाबत श्री. वाघ यांनी माहिती दिली.

अनंत देशमुख यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, स्मार्ट प्रकल्प, गटशेती, महाडीबीटी आदी योजनांची माहिती दिली. सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल अडाणी यांनी पंतप्रधान सुक्ष्म खाद्य उन्नयन योजना, स्मार्ट कॉटनबाबत गटांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन करीत प्रकाश साबळे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT