ताज्या बातम्या

Agriculture Exhibition : नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी प्रदर्शनात गर्दी

कृषी विभागाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाभरातील शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी गर्दी करीत आहेत.

Team Agrowon

Akola Agriculture Exhibition : बुलडाणा : कृषी विभागाने (Agriculture Department) आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय प्रदर्शनाला (Agriculture Exhibition) शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाभरातील शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान (Agriculture Technology) जाणून घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. शुक्रवारी (ता.१०) सुरू झालेल्या या प्रदर्शनाचा मंगळवारी (ता.१४) समारोप होणार आहे.

कृषी प्रदर्शनाला खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार श्वेता महाले यांनी भेट दिली. खासदार जाधव यांनी प्रदर्शनातील कृषी विभाग, तसेच इतर शासकीय विभागांचे दालन, बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी व इतर कृषी निविष्ठा पुरवठा कंपन्यांच्या दालनास भेट देऊन समाधान व्यक्त केले.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल थेट ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध झाल्याबद्दल श्री. जाधव यांनी समाधान व्यक्त केले.

आमदार श्वेता महाले यांनीही भेट देत कृषी प्रदर्शनात तज्ज्ञ व्यक्तीमार्फत मार्गदर्शन करण्यात येत असल्याने हे ज्ञान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असे सांगितले.

प्रदर्शनात कृषीविषयक माहिती सोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी पाककला स्पर्धा आणि तज्ज्ञ व्यक्तींमार्फत विविध सत्रांमध्ये माहिती देण्यात येत आहे.

कृषीविषयक माहिती देण्यासाठी शासकीय आणि इतर तंत्रज्ञान विषयक २०० दालने लावण्यात आली आहेत. यासोबतच विविध बचतगटांच्या खाद्यपदार्थांचे स्टॉलवर खवैय्यांची गर्दी होत आहे.

या सर्व वैविध्यामुळे शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकही मोठ्या संख्येने कृषी प्रदर्शनाला भेट देत आहेत. कृषी प्रदर्शनात मंगळवारी (ता.१४) सकाळी ११ वाजता कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. पी. जायभाये हे पौष्टिक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान व बाजारपेठ याबाबत मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजता कृषी महोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar | अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, शेतकरी संकटात, सरकारने लक्ष द्यावे- शरद पवार

Crop Advisory: कृषी सल्ला: कोकण विभाग

Trade War: व्यापारयुद्धात शेतकऱ्यांचे हित सांभाळा!

Agriculture Growth Rate: आकड्यांत अडकलेला विकास

Rain Crop Damage: पावसाने सोयाबीन, कापूस पिकांची हानी

SCROLL FOR NEXT